IND vs PAK : विराट कोहलीशी बोलताना शाहिन आफ्रिदी काय म्हणाला?, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

IND vs PAK : विराट कोहलीशी बोलताना शाहिन आफ्रिदी काय म्हणाला?, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषकापूर्वी टीम इंडियामध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. मात्र, आशिया चषकात विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. (IND vs PAK)

दरम्यान, पाकिस्तानचा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने यूएईमध्ये भारताच्या माजी कर्णधाराची भेट घेतली आणि सांगितले की तू फॉर्ममध्ये परत यावा यासाठी प्रार्थना करेन. पाकिस्तान क्रिकेटने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहिनने म्हटले आहे की, “तुझा फॉर्म परत यावा यासाठी प्रार्थना करत आहे. (IND vs PAK)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शाहिन आफ्रिदी युझवेंद्र चहल, विराट कोहली, ऋषभ पंत आणि केएल राहुलसह भारताच्या क्रिकेटपटूंना भेटतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सर्व भारतीय क्रिकेटपटू आफ्रिदीला त्याच्या दुखापतीबद्दल विचारपूस करताना दिसत आहे. रिषभ पंतसोबत बोलताना शाहिन आफ्रिदी गंमतीने म्हणाला, “यार मी तुझ्यासारखाच खेळायच आहे, मी फलंदाजीला सुरुवात करावी आणि एका हाताने षटकार मारावा”

यापूर्वी, विराट कोहलीने UAE मध्ये भारताच्या पहिल्या सराव सत्रापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तसेच संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि क्रिकेट दिग्गज मोहम्मद युसूफ यांची भेट घेतली होती.

हेही वाचा ;

 

Back to top button