नगर: विद्यापीठ उपकेंद्राचे 6 सप्टेंबरला भूमिपूजन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येणार | पुढारी

नगर: विद्यापीठ उपकेंद्राचे 6 सप्टेंबरला भूमिपूजन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येणार

नगर, पुढारी वृत्तसेवा: बाबुर्डी (ता. नगर) येथील पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारत भूमिपूजनासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सहा सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सध्या न्यू आर्टस् महाविद्यालतील इमारतीमध्ये सुरू आहे. विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारतीसाठी बाबुर्डी (ता. नगर) येथे 38 हेक्टर जागा घेण्यात आली आहे. तिथे दहा स्वेअर फुटाची इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात तळ मजल्यावर प्रशासकीय कामकाज चालणार असून, वरच्या मजल्यावर सभागृह आणि ग्रंथालय असणार आहे. त्यासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या इमारतीच्या भूमिपूजन समारंभ राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. दरम्यान, यापूर्वीही विद्यापीठ उपकेंद्राचे उद्घाटन झाले होते. आता पुन्हा एकदा विद्यापीठ उपकेंद्राच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे.

Back to top button