‘फिफा’ने बंदी उठवली | पुढारी

‘फिफा’ने बंदी उठवली

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर (एआयएफएफ) घातलेली बंदी उठवली आहे. फेडरेशनच्या कारभारात त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्याचा ठपका ठेवत ‘फिफा’ने ही बंदी लादली होती.

भारतात फुटबॉलचा कारभार पाहणार्‍या ‘एआयएफएफ’ची कार्यकारिणी बरखास्त करून न्यायालयाने त्या जागी तीनसदस्यीय प्रशासकीय समिती नेमली होती. यावर ‘फिफा’ने आक्षेप घेत बंदीची कुर्‍हाड उगारली होती. परंतु, फेडरेशनच्या निवडणुका घेऊन पुन्हा कार्यकारिणी समितीला अधिकार बहाल करण्याचे सुरू असलेले प्रयत्न लक्षात घेऊन ‘फिफा’ने ‘एआयएफएफ’चे निलंबन मागे घेत असल्याचे जाहीर केेले. ‘फिफा’च्या या निर्णयाने भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा मार्ग सुकर झाला आहे.

Back to top button