आर. अश्विनला कोणी दिली होती बोट मोडण्याची धमकी? | पुढारी

आर. अश्विनला कोणी दिली होती बोट मोडण्याची धमकी?

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन मैदानावर खूप संयमी असल्याने त्याला कोणी त्रास दिल्याचे, तो कुठल्या वादात अडकल्याचे ऐकण्यात नाही. परंतु काही वर्षांपूर्वीही त्याच्यासोबत एक अनपेक्षित आणि भयानक घटना घडली होती. एका शोदरम्यान आर अश्विनने याचा खुलासा केला आहे. एका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेदरम्यान काही मुलांनी बोट मोडण्याची धमकी दिली असल्याचे आर. आश्विनने सांगितले.

३३ वर्षाचा आर आश्विन एका चॅट शोमध्ये म्हणाला, मी जेव्हा १४-१५ वर्षाचा होतो. मी आणि माझा मित्र टेनिस बॉल स्पर्धेत अंतिम सामना खेळण्यासाठी तयार होतो. त्यापूर्वी काही ४-५ मुलांचा ग्रुप माझ्याकडे आला आणि मला चहा पिण्यासाठी घेऊन गेले. खाण्यासाठी ऑर्डर केली. आम्ही या पदार्थात काही मिसळले नसल्याचे सांगत जबरदस्तीने मला इडली-वडा खाण्यास सांगितले.  

त्यानंतर मला सामना होणाऱ्या ठिकाणी सोडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही विरोधी संघाचे आहोत. आणि त्यांना अंतिम सामना खेळायचा नसल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी धमकावले देखील. जर अंतिम सामना खेळलास तर बोट कापण्यात येईल अशी धमकी वजा इशारा दिला असल्यो अश्विनने यावेळी सांगितले. 

घाबरून मी त्यांचे ऐकले आणि त्या मुलांना विंनती केली की माझे वडील घरी येण्यापूर्वी मला घरी सोडा. खूप विंनती केल्यानंतर त्यांनी मला घरी सोडले. घरी पोहचल्यानंतर वडिलांनी मुलांसंदर्भात विचारले त्योवळी पहिल्यांदा ती माझी मित्र असल्याचे सांगितले आणि नंतर घडलेली खरी घटना सांगितली असल्याचे अश्विन यावेळी म्हणाला.

तसेच अश्विन पुढे म्हणाला, माझा मित्र मला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळण्यास सांगत होता. मात्र, माझ्या वडिलांना ते पसंत नव्हते. मी पारंपरिक क्रिकेट खेळावे अशी त्यांची इच्छा होती. असेही अश्विनने यावेळी सांगितले. 

Back to top button