#INDvENGW : सेमीफायनलवर पावसाचे सावट; नाणेफेकीला उशीर | पुढारी

#INDvENGW : सेमीफायनलवर पावसाचे सावट; नाणेफेकीला उशीर

सिडनी : वृत्तसंस्था

साखळी फेरीत अपराजित राहिलेला भारतीय संघ आज (ता.०५) पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला नमवून आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. भारताने आजपर्यंत झालेल्या सात स्पर्धांमध्ये एकदाही फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र, शानदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाला यंदाच्या फायनलचा दावेदार मानण्यात येत आहे. 

साखळी सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलिया, बांगला देश, न्यूझीलंड आणि श्रीलंकेला पराभूत करून आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्या, तरी आकडेवारी मात्र इंग्लंडचीच सरस आहे. या दोन्ही संघांदरम्यान वर्ल्डकपमध्ये पाचवेळा गाठ पडली असून, सर्व सामने इंग्लंडने जिंकले आहेत. 

संबंधित बातम्या

वेस्ट इंडिजमध्ये 2018 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला आठ विकेटने पराभूत केले होते. तर 2009, 2012, 2014 आणि 2016 मध्ये साखळी सामन्यात इंग्लंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात वर्ल्डकपपूर्वी झालेल्या तिरंगी स्पर्धेत भारताने इंग्लंडला पराभूत केले होते. तसेच वर्ल्डकपमध्येही शानदार कामगिरी केल्याने आत्मविश्‍वास वाढलेली टीम इंडिया 2018 चा वचपा काढण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. 

खेळपट्टीचे स्वरूप

सिडनीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. मात्र, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. जर सामना झालाच, तर त्यावेळी असणार्‍या ढगाळ वातावरणामुळे चेंडू स्विंग होण्याची शक्यता आहे. सामन्यात फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पावसाच्या शक्यतेने नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.

#INDvENGW : सेमीफायनलवर पावसाचे सावट; नाणेफेकीला उशीर

Back to top button