खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या अक्षय मंगवडेला रौप्य पदक | पुढारी

खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या अक्षय मंगवडेला रौप्य पदक

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

भुवनेश्वर (ओडिशा) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत १२५ किलो ओपन गटात तब्बल ४ कुस्त्या करत राष्ट्रकुल कुस्ती संकुलच्या अक्षय मंगवडे याने “रौप्य पदका”ची कमाई केली. त्यांने अनेक दिग्गज मल्लांचा पराभव करत पदकाला गवसणी घातली. 

अधिक वाचा : हार्दिक पांड्याची सहा महिन्यांनी ग्रँड एन्ट्री; फक्त ३७ चेंडूत शतकी तडाखा (Video)

संबंधित बातम्या

यामध्ये पहिल्या लढतीत दिल्लीच्या दिपक कुमारला ६-० तर जसदीप सिंग व दिल्लीच्या कुमारला प्रत्येकी २-६ ने मात दिली. तसेच अंतिम कुस्तीत ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन योगेश सिंगबरोबर लढत देत रौप्यपदकाची कमाई केली. 

अधिक वाचा : निवृत्त ‘एबी’ला किक्रेट दक्षिण आफ्रिकेकडून डेडलाईन

कुस्तीतील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे कुस्ती प्रशिक्षक राम सारंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय मंगवडे सराव करीत असून त्याने यापूर्वी देखील राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत देखील पदके मिळवलेली आहेत!

Back to top button