हार्दिक पांड्याने अवघ्‍या ५५ चेंडूत २० षटकार मारत केल्‍या १५८ धावा  | पुढारी

हार्दिक पांड्याने अवघ्‍या ५५ चेंडूत २० षटकार मारत केल्‍या १५८ धावा 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारतीय क्रिकेट संघातील  ऑलराउंडर हार्दिक पांड्या अखेर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघात खेळण्याआधी पांड्या सध्या डी वाय पाटील टी-20 लीग खेळत आहे. या स्पर्धेत तीन सामन्यात पांड्याने सलग दोन शतक लगावली आहेत. या स्पर्धेत तीन सामन्यात पांड्याने सलग दोन शतक लगावले आहेत. एवढेच नाही ५५ चेंडूत ६ चौकार तर २० गगनचुंबी षटकार मारत १५८ धावा करत नाबाद खेळी केली आहे. यापैकी १०० पेक्षा जास्‍त धावा या हार्दिकने षटकार मारुन बनवल्‍या आहेत. 

हार्दिक पांड्‍या रिलायन्‍स वन या संघाकडून खेळत आहे. यादरम्‍यान हार्दिक पांड्‍याचा स्ट्राइक रेट २८७.२७ होता.

संबंधित बातम्या

चार सामन्यात ३८ षटकारांसह केल्या ३४७  धावा

हार्दिक पांड्याने डी वाय पाटील टी -20 स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यात त्याने पहिल्या सामन्यात ४ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. यानंतर दुसर्‍या सामन्यात पांड्याने १० षटकारांच्या मदतीने १०५ धावा फटकावल्या. या सामन्यात त्याने ३७ चेंडूत शतक पूर्ण केले. तिसर्‍या सामन्यात पांड्याने पुन्हा ४ षटकारांसह ४६  धावा केल्या. आता चौथ्या सामन्यात त्याने २० षटकारांच्या मदतीने १५८ धावा केल्या. अशाप्रकारे पांड्याने चार सामन्यात ३८  षटकारांच्या मदतीने ३४७  धावा केल्या आहेत.

पाठीवर शस्त्रक्रिया करुन आल्यानंतर पांड्याने पुनरागमनासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. पण, न्यूझीलंडबरोबरच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला गोलंदाजीत आपला फिटनेस सिद्ध करता आला नव्हता. त्यामुळे त्याला ऐनवेळी संघात स्थान मिळवता आले नाही. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी पूर्णपणे तंदूरुस्त आहे का? विशेषतः गोलंदाजीतील तंदूरुस्ती तो सिद्ध करतो का हे बघावे लागेल.

Back to top button