#SAvsAUS : ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश | पुढारी

#SAvsAUS : ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुस-या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेवर ५ धावांनी विजय मिळवून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाशी सामना होणार असून हा सामना ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाला रंगणार आहे. 

दरम्यान, स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारली. द. आफ्रिकेसमोर १३५ धावांचे लक्ष्य होते, मात्र या सामन्याला पावसाचा फटका बसल्याने द. आफ्रिकेसमोरील विजयी लक्ष्यामध्ये डकवर्थ-लुईस नियमानुसार बदल करण्यात आला. त्यानंतर आफ्रिकन संघाला विजयासाठी १३ षटकांत ९८ धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र, हे आव्हान आफ्रिकेच्या संघाला पेलवले नाही व त्यांचा संघ ५ बाद ९२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. 

संबंधित बातम्या

Back to top button