कोरोना : नोव्हाक जोकोविचकडून सर्बियाला 8.3 कोटींची मदत | पुढारी

कोरोना : नोव्हाक जोकोविचकडून सर्बियाला 8.3 कोटींची मदत

माद्रिद : वृत्तसंस्था 

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी सर्बियाला 10 लाख युरो (8.3 कोटी भारतीय रुपये) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशाने वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. या पैशाचा वापर रेस्पिरेटर्स आणि अन्य वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी केला जाणार असल्याचे जोकोविच म्हणाला. 17 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता हा खेळाडू स्पेनच्या मारबेला येथे अडकला आहे. माझ्या देशातील आणि सर्व जगातील वैद्यकीय स्टाफचे आभार मानू इच्छितो. जे कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आपले योगदान देत आहे. मी आणि माझी पत्नी येलेना कशा पद्धतीने मदत करू याची योजना आखत होतो, असे जोकोविच म्हणाला. सर्बियामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे व 450 हून अधिक रुग्ण आहेत.

 

Back to top button