‘निवृत्ती कुठली, येत्या दोन वर्षात धोनी धमाका करणार’  | पुढारी

'निवृत्ती कुठली, येत्या दोन वर्षात धोनी धमाका करणार' 

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगला ट्विटरवर चाहत्यांनी धोनीच्या निवृत्ताबाबत त्याचे मत विचारले. त्यावेळी त्याने धोनीने निवृत्तीची घोषणा केलेली नाही. तो येत्या दोन वर्षात भारताकडून खेळत मोधा धमाका करणार असा विश्वास व्यक्त केला. याचबरोबर हॉगने धोनी शांततेने सर्व परिस्थिती हाताळतो त्याची कारकिर्द ‘मनोरंजक’ आहे असे म्हणत कॅप्टन कूलची प्रशंसा केली. 

ऑस्ट्रेलियाचा ४९ वर्षाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगला एका ट्विटर युजरने ‘जर २०२० ची आयपीएल रद्द झाली तर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी याच्यावर तुझे मत काय?’ असे विचारले. याला उत्तर देताना हॉग म्हणाला, ‘या शक्यता वर्तवल्या जात आहेत, मला नाही वाटत त्याने अजून निवृत्ती जाहीर केली आहे, तो या बाबतीत अत्यंत शांत आहे आणि जी गोष्ट साध्य करायची आहे त्याच्याकडे तो वाटचाल करत आहे. त्याची कराकिर्द मनोरंजक आहे त्यामुळे त्याने जे काय केले त्याचा आनंद घेऊया. मला वाटते की येत्या दोन वर्षात तो भारताकडून खेळत अजून एक धमाका करेल.’ 

३८ वर्षाच्या महेद्रसिंह धोनी अखेचा २०१९ त्या विश्वचषकातील सेमी फायनलमध्ये खेळताना दिसला होता. विश्वचषकानंतर त्याने दीर्घ सुट्टी घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत कधी ऋषभ पंत तर कधी केएल राहुल भारताकडून विकेट किपिंग करत आहे. 

Back to top button