प्रीमियर लीग 17 जून पासून पुन्हा सुरु होणार  | पुढारी

प्रीमियर लीग 17 जून पासून पुन्हा सुरु होणार 

लंडन : पुढारी ऑनलाईन 

प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेचा 2019-20 चा उर्वरित हंगाम हा जून महिन्याच्या 17 तारखेपासून पुन्हा सुरु होणार आहे. याबाबत प्रीमियर लीगने, प्रीमियर लीगमधील भागधारकांनी 17 जून पासून 2019- 20 चा उर्वरित हंगाम सुरु करण्याबाबत सहमती दर्शवल्याचे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. 

अॅस्टोन व्हिला विरुद्ध शेफिल्ड युनायटेड आणि मँचेस्टर सिटी विरुद्ध अर्सेनाल या पुढे ढकलेले सामने 17 जूनला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर जून 19 पासून सामन्यांच्या पूर्ण फेऱ्या सुरु करण्यात येतील. बुंदेसलिगा प्रमाणेच प्रीमियर लीगचे सर्व सामने हे बंद मैदानात म्हणजेच प्रेक्षकांविना सामने खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ नये यासाठी ही खबरदार घेतली आहे. 

संबंधित बातम्या

वाचा : टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीची सावध भूमिका

प्रीमियर लीग कार्यकारी अधिकारी रिचर्ड मास्टर यांनी ‘आम्ही तात्पूर्त्या स्वरुपात प्रीमियर लीग 17 जून पासून सुरु करत आहोत. पण जोपर्यंत आरोग्य सुरक्षा आणि सुरक्षा मानके तपासून पाहिले जात नाहीत तोपर्यंत या तारखा निश्चित केल्या जाणार नाहीत.’ असे वक्तव्य केले. प्रीमियर लीगने त्यांच्या भागधारकांनी एकमताने सराव सुरु करण्याबाबत सहमती दर्शवली आहे असे सांगितले. त्यामुळे आता संघ एकमेकांना कमीतकमी स्पर्ष करत सांघिकरित्या सराव करु शकतात.

वाचा : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर

प्रीमियर लीगने सरावावेळी मैदानावर कडक आरोग्य मानके राबवणार असल्याचे सांगितले. तसेच खेळाडू आणि स्टाफची आठवड्यातून दोन वेळा कोरोनाची चाचणी होणार असल्याचेही स्पष्ट केले. 

Back to top button