बुमराहपूर्वी हे दिग्गज क्रिकेटपटू पडले होते अँकरच्या प्रेमात | पुढारी

बुमराहपूर्वी हे दिग्गज क्रिकेटपटू पडले होते अँकरच्या प्रेमात

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

नुकतचं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने स्पोर्ट्स अँकर संजना गणशेन हिच्यासोबत सात फेरे घेतले. बुमराहच्या लग्नानंतर क्रिकेट जगतात एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे त्या दिग्गज क्रिकेपटूंची जे क्रिकेटच्या मैदानावर अँकर्सच्या प्रश्नांना उत्तर देतादेता त्यांच्या प्रेमाच पडले. अँकर्सची लग्न करणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत आता जसप्रीत बुमराहच्‍या समावेश झाला आहे. 

 क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी 

When I met Stuart Binny, we were both nowhere' - Mayanti Langer

भारतातील आघाडीची स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर आणि क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी यांनी २०१२ साली विवाह केला आहे. मयंतीने आतापर्यंत फुटबॉल, आयपीएल आणि क्रिकेट वर्ल्ड कप सारख्या स्पर्धामध्ये अँकरिंग केले आहे. स्टुअर्ट बिन्नीने भारताकडून ६ कसोटी, १४ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. गतवर्षी त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग  

BBL 09: WATCH - “Play well or don't come home”, Erin Holland's message for  husband Ben Cutting

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग याने याच वर्षी चॅनल ७ ची प्रेझेंटर एरिन हॉलंड हिच्याशी लग्न केले.  एरिन हॉलंड अँकर असून तिने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये अँकरिंग केले आहे. आयपीएल, बीग बॅश लीगमध्ये अँकरिंग केलेली ॲरिन ब्यूटी क्वीन, मॉडेल, डान्सरही आहे. २०१३ मध्ये तिने मिस ऑस्ट्रेलियाचं विजेतेपद पटकावले होते.

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मार्टिन गुप्‍टिल

Cricket World Cup 2019: Laura McGoldrick stands by her Black Caps husband  Martin Guptill | Stuff.co.nz

न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मार्टिन गुप्‍टिल यानंही २०१४ मध्ये स्काई स्पोर्ट्स चॅनलची अँकर लॉरा मॅकगोल्ड्रिक हिच्याशी लग्न केले.

मॉर्ने मॉर्केल 

Roz Kelly and Morne Morkel: The new power couple in town | Daily Telegraph

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मॉर्केल यानंही २०१४ मध्ये चॅनल ९ ची अँकर रोज कॅली हिला जीवनसाथी म्हणून निवडले.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्शन

cricketers

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्शनेही २०१४ मध्ये चॅनेल ७ ची अँकर रेबिका ओडोनोव्हॅनशी लग्न केलं.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन 

Lee Furlong - Shane Watson

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन यानंही २०१०मध्ये अँकर ली फरलाँगही लग्न केले. ती फॉक्स स्पोर्ट्सची अँकर होती.

पाकचे खेळाडू इम्रान खान 

Imran and Reham Khan tie the knot in Bani Gala

पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू इम्रान खान यांनी २०१५मध्ये बीबीसीची प्रेझेंटर रेहम खानशी लग्न केलं, परंतु त्यांचा संसार १० महिनेच टिकला. 

जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ 

Page 3 - 5 Indian cricketers who married twice

भारताचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आता आयसीसीच्या मॅच रेफरी म्हणून काम करतात . जवागल श्रीनाथ यांनी 1999 मध्ये ज्योत्स्ना सोबत लग्न केले. मात्र लवकरच त्‍यांचा घटस्फोट झाला. नंतर श्रीनाथने 2008 मध्ये माधवी पतरावली या पत्रकारासोबत लग्न केले. श्रीनाथने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 300 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Back to top button