टी-20 मालिकेचा थरार आजपासून | पुढारी | पुढारी

टी-20 मालिकेचा थरार आजपासून | पुढारी

लखनौ : वृत्तसंस्था

एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या भारतीय महिला संघाचा प्रयत्न शनिवारपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा असणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेतील दुसर्‍या सामन्यात नऊ विकेटस्ने विजय सोडल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्ध म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्ण मालिकेत फॉर्मात दिसला आणि टी-20 मध्ये देखील आपला फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारताने तिसर्‍या आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यात चांगली धावसंख्या उभारली; पण पहिल्या आणि पाचव्या एकदिवसीय लढतीत त्यांचे फलंदाज चालू शकले नाहीत.

जेमिमाह रॉड्रिग्जला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळे शेफाली वर्माची कमतरता जाणवली. गेल्या वर्षी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत या 17 वर्षीय खेळाडूने चांगली कामगिरी केली होती आणि ती या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणार आहे. स्मृती मानधनालादेखील फक्‍त एक चांगली खेळी करता आली. त्यामुळे टी-20 मालिकेत तिच्याकडून अपेक्षा असतील. हरमनप्रीत कौरने एकदिवसीय मालिकेत 160 धावा केल्या. त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. हरलीन देओल आणि ऋचा घोष संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :

भारत :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज दीप्‍ती शर्मा, ऋचा घोष, हरलीन देओल, सुषमा वर्मा (यष्टिरक्षक), नुजहत परवीन (यष्टिरक्षक), आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव, राजेश्‍वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रत्यूषा, सिमरन दिल बहादुर

दक्षिण अफ्रीका :

सुने लुस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनीम इस्माईल, लॉरा वॉलवार्ट, त्रिशा चेट्टी, सिनालो जेटा, तस्मीन ब्रिटझ्, मारिजान कॅप, नोंडिमिसो सांगेज, लिजेल ली, एनेके बॉश, फेय ट्यूनेक्लिफ, नॉनकुलुलेको मलाबा, मिगनॉन डु प्रिज, नाडिन-डी-क्लर्क, लारा गुडॉल, टुमी सेखुखुने.

Back to top button