EURO 2020 : हा गोल नक्कीच ठरणारसर्वात हास्यास्पद गोल ! ( Video ) | पुढारी

EURO 2020 : हा गोल नक्कीच ठरणारसर्वात हास्यास्पद गोल ! ( Video )

पुढारी ऑनलाईन डेस्क : युरो कप २०२० (  EURO 2020 ) मध्ये बाद फेरीत स्पेनचा गोलकिपर उनाई सायमनने सामन्याच्या सुरुवातीलाच एक घोळ घालून ठेवला. यामुळे पहिल्या हाफमध्ये स्पेन क्रोएशियाकडून १ – ० असा पिछाडीवर पडला होता. 

स्पेनने क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यात पहिल्या हाफमधील १९ मिनिटे आपले वर्चस्व गाजवले होते. पण, स्पेनचा गोलकिपर सायमनने घोळ घातला. स्पेनच्या मधल्या फळीत खेळणाऱ्या पेड्रीने सायमनकडे एक बॅकपास दिला. हा बॅकपास आरामात आडवू अशा अविर्भावात सायमन होता. पण, तो हा बॅकपास आडवू शकला नाही. त्याला बॉलवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे हा चेंडू त्याच्या उजव्या पायाला स्पर्श करुन गोलपोस्टकडे वेगाने गेला. 

सायमनला आपली चूक लक्षात आल्यानंतर तो झटक्यात बॉल आडवण्यासाठी मागे वळला. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. बॉल गोलपोस्टमध्ये गेला होता. अशा प्रकारे स्पनेच्या गोलकिपरनेच स्पेनवर पहिला गोल दागला. सायमनच्या या वेंधळेपणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तर त्याच्यावर मीम्सचा पाऊस पाडला. 

स्वतःवर गोल केलेल्या स्पेनला पहिल्या हाफमध्ये पाब्लो सरबियाने दिलासा दिला. त्याने पहिला हाफ संपण्यास काही वेळ असतानाच क्रोएशियावर गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सिजर अझप्लिक्युएटा आणि फेरेन टोरेस यांनी दोन गोल करत ३ – १ अशी आघाडी मिळवली. 

सामना क्रोएशियाच्या हातातून गेला असे वाटत असतानाच मिसलाव ऑरसिक आणि मारिओ पासलिक यांनी पाठोपाठ दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. अखेर सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. पण, एक्स्ट्रा टाईममध्ये क्रोएशिया त्वेशाने खेळत होती पण, स्पेनच्या अलवारो मोराटा आणि माकेल ओयार्झबालने गोल करत सामना ५-३ असा जिंकून दिला. स्पेन आता उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडबरोबर दोन हात करणार आहे. स्वित्झर्लंडने बाद फेरीत फ्रान्सला पेनाल्टी शूटाऊटमध्ये मात दिली आहे.

Back to top button