भारताचा कुस्तिपटू रवी कुमार दहिया फायनलमध्ये | पुढारी

भारताचा कुस्तिपटू रवी कुमार दहिया फायनलमध्ये

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटात भारताचा कुस्तिपटू रवी कुमार दहिया याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये रवी कुमार दहिया याने कझाकिस्तानच्या नुरीस्लाम सनायेव याला चितपट केले.

रवी कुमार आता गुरुवारी फायनलसाठी आखाड्यात उतरणार आहे. सुशील कुमार नंतर फायनलमध्ये पोहोचलेला तो दुसरा भारतीय कुस्तिपटू आहे. पहिल्या राऊंडमध्ये रवी दहियाने २-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या राऊंडमध्येही त्याने कझाकिस्तानच्या कुस्तिपटूवर वर्चस्व कायम ठेवले.

दहियाने बल्गेरियाच्या जॉर्जी व्हॅलेंटिनोव्हला हरवत सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. सेमीफायनलमध्येही त्यांनी चांगली कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली आहे.

आज बुधवारी कुस्तीच्या आखाड्यात सुरुवातीच्या सामन्यात भारताच्या रवी कुमार दहिया याने विजयी सलामी दिली होती. त्याने फ्रीस्टाइलच्या ५७ किलो वजनी गटात कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरोस याला हरवले.

दरम्यान, ८६ किलो वजनी गटाच्या सेमी फायनलमध्ये भारताच्या दीपक पुनियाला पराभवाचा धक्का बसला. त्याला अमेरिकेच्या डेव्हिड टेलरने हरवले.

लव्हलिनाला कांस्यपदक…

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनल सामन्यात भारताची बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन आज बुधवारी सकाळी विजयी निर्धाराने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली होती. पण लव्हलिना हिचा तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली हिच्याकडून ०-५ असा पराभव झाला.

लव्हलिना सेमीफायनलमध्ये हारली तरी तिने कांस्यपदक जिंकले आहे.

भालाफेक : नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज बुधवारी (दि.०४) झालेल्या अ गटातील पात्रता फेरीत नीरजने जोरदार कामगिरी केली.

यामुळे तो अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने केलेल्या कामगिरीनुसार ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार तो थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : …या किल्ल्याची तटबंदी सावरणार कोण?

Back to top button