गहना वशिष्ठ न्यूड अवस्थेत आली लाइव्ह आणि म्हणाली हे अश्लिल आहे का? | पुढारी

गहना वशिष्ठ न्यूड अवस्थेत आली लाइव्ह आणि म्हणाली हे अश्लिल आहे का?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पोर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रा सोबतच अभिनेत्री गहना वशिष्ठ हिच्यावर गंभीर आरोप आहेत. ‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठ हिला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने याआधी पॉर्न फिल्म शूट केल्याप्रकरणी अटक केली होती. ती सध्या जामीनावर बाहेर आहे.

दरम्यान, गहनाच्या इंस्टाग्रामवरील लाइव्ह सेशनमुळे खळबळ उडाली आहे. तिने लाइव्ह सेशनमध्ये असे काही केले की ज्यामुळे तिच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या.

गहना सोमवारी इंस्टाग्रामवर सुमारे ३ मिनिटे लाइव्ह आली होती. यात तिने कोणत्याही प्रकारचे कपडे घातले नसल्याचा दावा करत हा व्हिडिओ असभ्य अथवा अश्लील आहे का, असा सवाल तिने चाहत्यांना केला.

जर कपडे घातले नसल्याचा हा व्हिडिओ पॉर्न नाही, तर ज्या व्हिडिओत आपण कपडे घातले आहेत त्यांना पॉर्न कसे म्हटले जात आहे, असाही सवाल तिने केला.

तिने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘कपडे न घालता लाइव्ह आली आहे. या व्हिडिओत आपण कोणतेही कपडे घातलेले नाहीत.

मात्र, कोणीही म्हणत नाही की हे पॉर्न आहे. पण आपण जेव्हा कपडे घालून व्हिडिओज बनवते तेव्हा लोक दावा करतात की हे अश्लिल आहे. ही पाखंडपणाची हद्द आहे.

गहनाच्या ३ मिनिटे ८ सेकंदाच्या व्हिडिओत ती अंथरुणावर झोपलेल्या अवस्थेत दिसत आहे.

गहनावर राज कुंद्राच्या पॉर्न फिल्मचे डायरेक्शन केल्याचा आरोप आहे. तिचे काही व्हिडिओज हे पॉर्न फिल्मचा भाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

राज कुंद्राकडून नव्या ॲपची तयारी सुरू होती. त्यात तो शमिता शेट्टीला ब्रेक देणार होता. असा खुलासाही गहनाने याआधी केला होता.

गहनाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ती स्वत: या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार होती. पण, यासंबंधी तिची शमिता शेट्टीशी कधीच भेट झाली नाही. गहना केवळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होती. शमिताशिवाय काही कलाकारांना चित्रटात घेण्याविषयी विचार सुरू होता.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

Back to top button