माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना धक्का सुरुच; मंत्रिमंडळात मुलाला स्थान नाही! | पुढारी

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना धक्का सुरुच; मंत्रिमंडळात मुलाला स्थान नाही!

बेंगलोर : पुढारी ऑनलाईन:  कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना केंद्रीय नेतृत्वाने झटका दिला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा बी. एस. विजयेंद्र याला मंत्रिमंडळात स्थान नाकारले आहे.

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडताना ठेवलेल्या अटींमध्ये मुलाला मंत्रिपद ही प्रमुख अट होती.

येडियुरप्पांच्या पसंतीचा मुख्यमंत्री निवडल्यानंतर सगळ्याच अटी मान्य करता येणार नाही हा संदेश केंद्रीय नेतृत्वाने दिला आहे.

बी. एस. येडियुरप्पा यांनी पद सोडताना केंद्रीय नेतृत्वासमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या.

त्यात येडियुरप्पा यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री, मोठा मुलगा खासदार बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा आमदार बी. एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद अशा अटी ठेवल्या होत्या.

येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय असलेले आणि लिंगायत समजाचे नेते बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

राज्यात फेरबदल होण्याआधीच केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे मोठ्या मुलाला लगेच मंत्रिपद मिळेल असे नाही.

मात्र, विजयेंद्र याला संधी मिळेल असे त्यांना वाटत होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने येडियुरप्पा यांना धक्का दिला आहे.

बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे. यामध्ये विजयेंद्र याला घेण्यात आलेले नाही.

विजयेंद्र सरकारमध्ये आणि मंत्र्यांच्या खात्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्यावरून येडियुरप्पा मंत्रिमंडळात प्रचंड नाराजी होती.

त्यामुळे त्याला मंत्रिमंडळात घेतल्यास आणखी नाराजी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळेच विजयेंद्रला बाजुला सारण्यात आले आहे.

नव्या मंत्रिमंडळात ८ लिंगायत, वक्कलीग आणि ओबीसी समाजाचे प्रत्येकी ७, दलित समाजाचे ३ एसटीचा एक आणि एका महिलेचा समावेश आहे.

दिल्लीत शिक्कामोर्तब

बोम्मई यांनी शपथ घेतल्यानंतर ते दिल्लीला गेले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

त्यानंतर पुन्हा एकदा ते दिल्लीला गेले होते. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्रिमंडळ यादी अंतिम करून घेतली. केंद्रीय नेतृत्वाने विजयेंद्र याच्या सहभागाला नकार दिल्याने येडियुरप्पा यांना सत्तेबाहेर रहावे लागले आहे.

पहा व्हिडिओ:  तटबंदी सावरणार कशी?

Back to top button