राज कुंद्रा याच्या प्रोडक्शन हाऊसने दिली होती ‘ती’ ऑफर, मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट | पुढारी

राज कुंद्रा याच्या प्रोडक्शन हाऊसने दिली होती 'ती' ऑफर, मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसने ‘तशी’ ऑफर दिली होती. असा गौप्यस्फोट एका मराठी अभिनेत्रीने केला आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर रोज काही ना काही नवे खुलासे समोर येत आहेत. अनेक मॉडेल्स, अभिनेत्रींनी कुंद्रावर आरोप केले आहेत. आता मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने गौप्यस्फोट केला आहे.

अधिक वाचा – 

मनिषीने तिला कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसमधून ऑफर आली असल्याचा खुलासा केला आहे. मनिषा केळकरने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाउसमधून फोटो आणि व्हिडिओची मागणी करण्यात आली होती, असे तिने मुलाखतीत म्हटले आहे.

अधिक वाचा – 

ती म्हणाली, कुंद्राचं प्रोडक्शन हाऊस नावाजलेलं आहे. असं मला वाटलं. त्यावेळी मी त्यांना भेटले. त्यांनी माझ्याकडे काही फोटोंची मागणी केली होती.

समाधानकारक उत्तर मिळाले नाही

काही व्हिडिओ शूट करणार आहे. असे तो म्हणाला होता. पण, ती म्हणाली-राजच्या सहकाऱ्यांना मी प्रश्न विचारले. फोटोशूट काय करायचे आहे? किंवा व्हिडिओ शूटची थीम काय आहे? असा प्रश्न त्यांना विचारला. पण, तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाहीत. म्हणून ऑफर नाकारल्याचं ती म्हणाली.

मनिषा पुढे म्हणाली, ज्या फोन क्रमांकावरून कॉल आला होता. त्याचा शोध घेतला असता तो क्रमांक नायजेरियाचा असल्याचं लक्षात आलं. याचा आधीचं अंदाज असल्यामुळे ऑफर नाकारली.

अधिक वाचा – 

आपला मोबाईल कुणालाही देऊ नका. पासवर्ड सांगू नका, असेही तिने सल्ला दिला.

मनिषाने चंद्रकोर, ह्यांचा काही नेम नाही, भोळा शंकर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर, ती काही हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे. यामध्ये बंदूक, लॉटरी अशा हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

Back to top button