पुढारी ऑनलाईन : MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कम्बाईन परीक्षा कधी घेतली जाणार असून, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दि. ९ एप्रिल, २०१९ रोजीच्या पत्रान्वये सूचना मिळाल्या होत्या.
त्यानुसार, ही परीक्षा आयोगाने प्रसिध्दीपत्रक काढत पुढे ढकलली होती.
अधिक वाचा –
आता ही परीक्षा ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल.
असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.
अधिक वाचा –
राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने ही परीक्षा आयोगाने सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दि. ३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार ही परीक्षा ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जूनपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली. सांगली, सातारा आणि कोल्हापूर, मुंबई, कोकणसह अन्य ठिकाणी महापुराचा फटका बसला. त्यामुळे या काळात परीक्षा घेणे अशक्य होते. त्यामुळे १८ जुलैपर्यंत परीक्षा न झाल्यास संयुक्त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्येच होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका