भारतीय हॉकी : ऑस्‍ट्रेलियाला नमवत उपांत्‍य फेरीत धडक | पुढारी

भारतीय हॉकी : ऑस्‍ट्रेलियाला नमवत उपांत्‍य फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टोकियाे ऑलिम्‍पिकमध्‍ये आज अत्‍यंत चुरशीच्‍या सामन्‍यात भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्‍यपूर्व फेरीत ऑस्‍ट्रेलियाचा पराभव केला. १-० असा सामना जिंकत ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत भारतीय हॉकी महिला संघाने प्रथमच उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

आर्यलंडचा पराभव करीत महिला हॉकी संघाने स्‍पर्धेतील आपले आव्‍हान कायम ठेवले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्‍धचा सामना ४-३ असा सामना जिंकला होता.

आज विजयाच्‍या निर्धाराने भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरला होता.

भारतीय संघाने पहिल्‍या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला.

बाविसाव्‍या मिनिटाला पेनल्‍टी कॉर्नरवर गुरजीत कौरने गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली.

ऑस्‍ट्रेलियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला. ऑस्‍ट्रेलियाच्‍या खेळाडूंनी प्रयत्‍नांची शिकस्‍त केली मात्र बराेबरीचे यश  मिळाले नाही.

ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघास पहिल्‍या तीन  क्वार्टरमध्ये पाच पेनल्‍टी कॉर्नर मिळाले.

शेवटच्‍या तीन मिनिटांनी सलग ऑस्‍ट्रेलियास दाेन पेनल्‍टी कॉर्नर मिळाले. भारतीय संघाने  मात्र  भारतीय संघाने उत्‍कृष्‍ट बचाव केला.

अखेर १-0 ने भारताने सामना जिंकत टोकिया ऑलिम्‍पिकच्‍या उपांत्‍य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

तीन सामने पराभूत तरीही पुन्‍हा भरारी…

साखळी सामन्‍यामध्‍ये भारतीय महिला हॉकी संघाची सुरुवात अत्‍यंत निराशाजनक झाली होती. संघाने सलग तीन सामने गमावले होते.

सुरुवातीला नेदरलँडने एकतर्फी सामना जिंकला भारताचा ५-१ असा पराभव केला होता.

यानंतर दुसरा सामना जर्मनीबरोबर होता. हा सामना २-0 असा जर्मनीने जिंकला.

यानंतर ब्रिटनच्‍या टीमने भारताला ४-१ असा पराभव केला होता.

या सलग तीन पराभवानंतरही भारतीय महिला हॉकी संघाने पुन्‍हा भरारी घेत आर्यलंडवर मात केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्‍यपूर्व फेरीत प्रवेश केला.

यानंतर उपांत्‍यपूर्व फेरीत कमाल करत ऑलिम्‍पिकमध्‍ये तीनवेळा सुर्वण पदक पटकाविणार्‍या बलाढ्य ऑस्‍ट्रेलियाचा पराभव करत उपांत्‍य फेरीत धडक मारली.

आता ४ ऑगस्‍ट रोजी होणार अर्जेंटीनाविरुद्‍ध उपांत्‍य फेरीतील सामना

ऑस्‍ट्रेलियाचा पराभत करत महिला हॉकी संघाने उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे. आता ४ ऑगस्‍ट रोजी भारताचा मुकाबला अर्जेंटीनाविरुद्‍ध होईल. अर्जेंटीनाच्‍या संघाने उपांत्‍यपूर्व फेरीत जर्मनीचा ३-० असा पराभव करत उपांत्‍य फेरीत प्रवेश केला आहे. आता ४ ऑगस्‍टच्‍या सामन्‍याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.

 

Back to top button