Olympics : डॅनिल मॅद्वेदेव पंचांना म्हणाला माझ्या मृत्यूची जबाबदारी घेणार का? | पुढारी

Olympics : डॅनिल मॅद्वेदेव पंचांना म्हणाला माझ्या मृत्यूची जबाबदारी घेणार का?

टोकियो : पुढारी ऑनलाईन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू डॅनिल मॅद्वेदेव अत्यंत अस्वस्थ झाला. या अस्वस्थतेतूनच त्याने चेअर अंपायरना विचारले की जर माझा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का?

टोकियो ऑलिम्पिकच्या टेनिस कोर्टवर असे काय घडले की डॅनिल मॅद्वेदेवला थेट आपल्या मृत्यूच्या गोष्टी कराव्या लागल्या? तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस ( दि.२८ ) सूर्यनारायणांच्या चढ्या पाऱ्यानं सुरु झाला. त्याचा परिणाम खेळाडूंवरही झाला.

रशियाचा डॅनिल मेद्वेदव आणि इटलीचा फॅबिओ फॉगनिनी यांच्यात सामना सुरु होता. सामन्यादरम्यानच मेद्वेदेवला उष्णतेचा प्रचंड त्रास होऊ लागला. अखेर त्याने वैद्यकीय विश्रांती घेतली.

यादरम्यान, दोन वेळा मेद्वेदेवच्या प्रशिक्षकांना बोलावण्याची वेळ आली.

माझे फुफ्फूस ब्लॉक झाले की काय?

मेद्वेदेव म्हणाला की, ‘पहिल्या सेटपासूनच मला अस्वस्थ वाटत होते. मी चांगल्या प्रकारे श्वास घेऊ शकत नाही असे वाटत होते. माझे फुफ्फूस ब्लॉक झाले आहे. मी व्यवस्थित श्वास घेत नव्हतो.’

दरम्यान, पंचांनी त्याला दुसऱ्या सेटदरम्यान तू ठीक आहेस का असे विचरले त्यावेळी डॅनिल मॅद्वेदेव म्हणाला की, ‘मी माझा सामना पूर्ण करेन पण, माझा मृत्यू देखील होऊ शकतो. त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का?’

तो पुढे म्हणाला, हा आतापर्यंतचा सर्वात दमट दिवस होता. किंबहुणा सर्वात उष्ण. सूर्य खूरच तापला होता. दुसऱ्या सेटनंतर माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली.

मी खालीच बसलो, मला माझा श्वास अडकल्यासारखा वाटला. मी कोर्टवर खाली पडतो की काय असे वाटले.’

वैद्यकीय विश्रांतीनंतर सामना घातला खिशात

मेद्वेदेवने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटदरम्यान १० मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर फॉगनिनीची सर्व्हिस मोडून निर्णायक सेटचे पहिले तीन गेम जिंकले. त्यानंतर २ तास २५ मिनिटे चाललेला सामना जिंकला.

जोकोविचच्या मागणीचे समर्थन करताना डॅनिल मॅद्वेदेव म्हणाला की, ‘आयोजकांनी सामना थोडा उशीरा सुरु करावा. मी हे पहिल्या फेरीपासून सांगत आहे आणि आताही तेच सांगेन.’

जोकोविचने ज्यावेळी सामना सुरु होतो त्यावेळी उष्णतेचा पारा ३२ डिग्रीपासून चढत जातो आणि तो ३७ डिग्रीपर्यंत पोहचतो. त्यामुळे सामना उशीरा सुरु करावा असे त्याचे मत होते.

‘मी असं ऐकलं आहे की उद्यापासून ते सामन्याची वेळ बदलतील पण, पाहुया काय होतं ते.’ असे मेद्वेदेव म्हणाला.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : गंगेत तरंगणाऱ्या मृतदेहांची आपण माफी मागायला हवी

Back to top button