पी व्‍ही सिंधू तिसर्‍या फेरीत, हाँगकाँगच्‍या चेन गँनचा पराभव | पुढारी

पी व्‍ही सिंधू तिसर्‍या फेरीत, हाँगकाँगच्‍या चेन गँनचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टोकिया ऑलिम्‍पिकमध्‍ये भारताची अन्‍य खेळांमध्‍ये निराशाजनक कामगिरी होत असताना बॅडमिंटनपटू
पी व्‍ही सिंधू हिने आपली विजयाची मालिका कायम ठेवली. सलग दुसरा विजय नोंदवत पी व्‍ही सिंधू तिसर्‍या फेरीत पोहचली.

अधिक वाचा 

टोकियो ऑलंम्‍पिकमध्‍ये महिला एकेरीच्‍या सामन्‍यात सिंधूने हाँगकाँगच्‍या चेंयुग गँन हिचा सलग दोन सेटमध्‍ये पराभव केला. या विजयामुळे ती आता नॉकआउट फेरीत पोहचली आहे.

सिंधूने पहिल्‍या सेटमध्‍ये २१-९ असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्‍ये चेंगुग गँन हिने जोरदार लढत दिली. १४-१४ अशी बरोबरी होती. मात्र सिंधूने आघाडी घेत २१-१६ अशा फरकाने दुसरा सेटही जिंकला.

अधिक वाचा 

२१-९, २१-१६ असा सलग दोन सेटमध्‍ये सामना आपल्‍या नावावर केला. या विजयामुळे सिंधुचा तिसर्‍या फेरीतील प्रवेश झाला आहे.पहिल्‍या सामन्‍यात सिंधूने इस्‍त्रायलच्‍या पोलिकार्पोवाचा पराभव केला होता.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…

 

Back to top button