पिंपरी : हातात पिस्तुल घेऊन फोटोशूट भावंडांच्या अंगलट! | पुढारी

पिंपरी : हातात पिस्तुल घेऊन फोटोशूट भावंडांच्या अंगलट!

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : हातात पिस्तुल घेऊन फोटो आणि व्हिडीओ काढणे भावंडांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर गुंडा विरोधी पथकाने मंगळवारी (दि. २७) त्यांना बेड्या ठोकल्या असून फोटोशूट करताना वापरलेले पिस्तुल देखील जप्त करण्यात आले आहे.

अधिक वाचा :

आरशान शाकीर शेख (वय २५) आणि उमर जाकीर शेख (२१, दोघेही रा. हसनपापा चाळ, दत्तवाडी, आकुर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकातील पोलिस कर्मचारी रामदास कुंडलिक मोहिते यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरशान आणि आरोपी उमर हे सख्खे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, त्यांनी हातात पिस्तुल घेऊन फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते.

अधिक वाचा :

यातील एक व्हिडीओ गुंडा विरोधी पथकाच्या हाती लागला. त्यानंतर पथक प्रमुख सहायक निरीक्षक हरिष माने यांनी बातमीदाराकडून आरोपी भावंडांची गोपनीय माहिती मिळवली.

त्यानुसार, आकुर्डी परिसरात सापळा रचून दोन्ही भावांना अटक केली. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिकीमध्ये पोलिसांना व्हिडीओत वापरलेले ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल देखील मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक माकणे तपास करीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button