पूजा राणी, दीपिकाकुमारी पदकाच्‍या समीप | पुढारी

पूजा राणी, दीपिकाकुमारी पदकाच्‍या समीप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टोकिया ऑलिम्‍पिकमध्‍ये आज (दि. २८) भारतीय खेळाडुंनी चमकदार कामगिरी केली. बॉक्‍सिंगमध्‍ये पूजा राणी तर तिरंदाजीत दीपिकाकुमारी या दोघींनी पुढील फेरीत प्रवेश केला.  पूजा राणी आणि दीपिकाकुमारी यांच्‍यासह बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधू हिने आपली विजयाची मालिका कायम ठेवली आहे. या भारताचे पदक पटकवण्‍याची आशा कायम राहिली आहे.

सलग दुसरा विजय नोंदवत पी. व्‍ही. सिंधू अंतिम १६मध्‍ये पोहचली. या कामगिरीमुळे भारताच्‍या पदकाच्‍या अशा पल्‍लवित झाल्‍या आहेत.
तिरंदाजीमध्‍ये दीपिकाकुमारीने अमेरिकेच्‍या जेनिफर म्‍यूसिनो-फर्नांडीस हिचा ६-४ असा पराभव केला. अंतिम आठमधील आपले स्‍थान निश्‍चित केले.

बॉक्‍सिंगमध्‍ये महिला ७५ किलो वजन गटात भारताच्‍या पूजा राणी हिने अल्‍जेरियाच्‍या इचरक चँक हिचा ५-० असा पराभव केला. पुजाने अंतिम १६मध्‍ये आपले स्‍थान पक्‍के केले.

बॉक्‍सिंगमध्‍ये अंतिम १६मध्‍ये आपले स्‍थान निश्‍चित करणारी पूजा रानी ही भारताची दुसरी बाँक्‍सर आहे.
दीपिकाकुमारीनेही दमदार खेळी करत विजय नोंदवला. आता पदकासाठी तिला आणखी एका विजयाची गरज आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

Back to top button