

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : 'देशात १९९१ अर्थव्यवस्थेची स्थिती होती, तशीच अर्थव्यवस्थेची स्थिती येणाऱ्या काळात होईल. त्यासाठी सरकारने यासाठी तयार राहिले पाहिजे,' असा सल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. याआधीही कोरोनावरून डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारला सल्ला दिला होता.
अधिक वाचा
१९९१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करण्यात आले होते. तत्पुर्वी डॉ. सिंग हे यूजीसीचे अध्यक्ष होते.
अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर २४ जुलै, १९९१ रोजी त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घालणारा अर्थसंकल्प मांडला होता. या घटनेला आज ३० वर्षे पूर्ण झाली.
या पार्श्वभूमीवर डॉ. मनमोहन सिंग यांनी मत व्यक्त केले आहे.
अधिक वाचा
ते म्हणाले, 'सध्याची वेळ ही खुश होण्याची किंवा कोणत्या गोष्टीत मग्न राहण्याची नाहीय. आपल्याला आत्मपरीक्षण आणि विचार करावा लागणार आहे.
आपला देश अशा टप्प्यावर आहे की, पुढील मार्ग १९९१ च्या संकटाच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक आहे. देशासाठी आपल्याला प्राधान्यक्रम पुन्हा ठरवण्याची गरज आहे.'
ते पुढे म्हणाले, '३० वर्षांपूर्वी काँग्रेसने भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणांची सुरूवात केली होती. पक्षाने देशाच्या आर्थिक धोरणांसाठी एक नवा मार्ग तयार केला होता.
अधिक वाचा
गेल्या तीन दशकांत आलेल्या विविध पक्षांच्या सरकारचा अजेंडा तोच राहिला. त्यामुळे आपल्या देशाची गणना जगाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत केली जाते.
सुधारणांसाठी ज्या काही गोष्टी केल्या त्यात माझ्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे.
गेल्या तीन दशकांतील आर्थिक प्रगती पाहून मला अभिमान वाटतो. या कालावधीत ३० कोटी भारतीय नागरिक गरीबीतून बाहेर आहे. कोट्यवधी नोकऱ्याही निर्माण झाल्या.
अधिक वाचा
कोरोनाबाबत बोलताना ते म्हणाले, 'कोरोना महामारीमुळे कोट्यवधी नोकऱ्या गेल्या. याचे दु:ख वाटत आहे.
आरोग्य आणि सामाजिक क्षेत्र मागे राहिले. ते आपल्या आर्थिक प्रगतीच्या गतीप्रमाणे सोबत आलेले नाही, हे अपयश अधोरेखित करणारा हा काळ आहे.
या कालावधीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि अनेकांचे रोजगारही गेले. असे व्हायला नको होतं.'
हेही वाचलेत का:
पहा व्हिडिओ: रंकाळा ओव्हरफ्लो