नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: मल्याळम अभिनेत्री चित्रा यांचे चेन्नई येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५६ वर्षांच्या होत्या. याबाबतची माहिती श्रीधर पिल्लई याच्या ट्विटवरून दिली. यानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीधर पिल्लई याच्या ट्विटवरून मल्याळम अभिनेत्री चित्रा (५६) यांने अनेक भाषांमध्ये चित्रपट केले असून, चेन्नईमध्ये शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.
दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांचा 'चेरन पांडियान' आणि पांडियाराजन यांचा 'गोपाला गोपाला' या चित्रपटातील भूमिकेने त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. 'नेल्लनई विज्ञापन' रिलीज झाल्यानंतर चित्रा यांना नेल्लनई चित्रा' असे नामकरण केले होते.
चित्रा यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रा यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. खास करून त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड यासारख्या अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले.
त्यांनी मोहनलाल आणि प्रेम नजीर सारख्या सुपरस्टार कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. चित्रा यांच्या अचानक निधनाने त्यांच्या सहकारी कलाकारांनाही धक्का बसला आहे. अनेक कलाकारांसोबत चाहते त्यांच्या निधनावर शोक करत श्रद्धांजली अर्पण करत आहे.
हेही वाचलं का?
पाहा : वेबसिरीज 'जॉबलेस' पाहा प्लॅनेट मराठी' वर ३१ ऑगस्टपासून