नेटकरी म्‍हणतात, फैजल खान याचे आयुष्य आमिर खाननं उद्‍ध्‍वस्‍त केलं | पुढारी

नेटकरी म्‍हणतात, फैजल खान याचे आयुष्य आमिर खाननं उद्‍ध्‍वस्‍त केलं

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान आगामी ‘फॅक्ट्री’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सध्या फैजल खानचा वडापाव खातानाचा एक व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल झाला आहे.

फैजल खान मुंबईतील एका टपरीवर उभा राहून वडापाव खाताना नुकतेच दिसला आहे. या वेळी फैजलच्या खांद्यावर एक साईड बॅग अडकवलेली असून हातात ग्लोव्ह्ज देखील घातले आहेत.

व्हिडिओमध्‍ये फैजलने म्‍हटलं आहे की,   मला वडापाव शाळेत असल्यापासून आवडतो. हा व्हिडिओ विरल भियानी याच्या इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांच्या कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात एकाने फैजलला ‘क्यूट’ तर दुसऱ्याला त्याचा साधेपणा भावल्याने ‘तारे जमीं पर’ अशी हटके कॉमेंन्ट केली आहे.

‘आमिरनं भावाचं आयुष्य उद्‍ध्‍वस्‍त केलं’

फैजलने वडापाव विकणाऱ्या व्यक्तीच्या शर्टला हात लावला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी फैजलवर टीकेची झोड उडवली आहे. यात एकाने ‘गोल्व्होज वापरण्याचा फायदाच काय’, दुसऱ्याने ‘स्वस्तातील आमिर खान’ म्हटले आहे तर आणखी एकाने, ‘आमिर खाननं आपल्या भावाचं आयुष्य उद्‍ध्‍वस्‍त केलं, असे म्हटले आहे.

फैजल खानच्या आगामी ‘फॅक्ट्री’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या चित्रपटात फैजलने मुख्य भूमिकेसोबत दिग्दर्शन त्याने केले आहे. ‘फॅक्ट्री’ चित्रपट ३ सप्टेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे.

याआधी फैजलने ‘मेला’, ‘चिनार दास्तान’, ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटात काम केले होते. परंतु, त्याला फारसे यश मिळाले नाही. बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर फैजल खानने आपण नैराशेत गेल्याचा खुलासा केला होता.

हेही वाचलंत का?

( viralbhayani instagram वरून साभार) 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button