आसाम : तालिबान्‍यांचे समर्थन करणार्‍या १४ जणांना पडल्‍या बेड्या | पुढारी

आसाम : तालिबान्‍यांचे समर्थन करणार्‍या १४ जणांना पडल्‍या बेड्या

दिसपूर ; पुढारी ऑनलाईन: अफगाणिस्‍तानवर तालिबानने कब्‍जा केला आहे. यानंतर भारतातही काही जणांकडून तालिबान्‍याचे समर्थन केले जात आहे. भारतात तालिबानच्‍या समर्थकांवर ठोस कारवाई करण्‍यात येत आहे. आसाम पोलिसांनीही १४ जणांना अटक केली आहे. आसाम मधील या १४ जणांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यतातून तालिबानचे समर्थन केले होते, अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली.

तालिबान्‍यांनी अफगाणिस्‍तानमध्‍ये सत्ता काबीज केल्‍यानंतर लोकप्रिय शायर मुनव्‍वर राणा यांनीही तालिबान्‍याचे समर्थन केले होते.

तालिबान्‍यापेक्षा भारतातील माफियांकडे अधिक शस्‍त्रे असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले होते. राणा यांच्‍या पाठोपाठ समाजवादी पार्टीचे आणखी

एका खासदाराने तालिबान्‍याचे समर्थन केले होते.

यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असददुदीन ओवैसी यांनी तालिबानचे समर्थनात विधान केले होते.

अशरफ घनींचा बंधूची तालिबान्‍यांशी हातमिळवणी

तालिबानने सत्ता काबीज केल्‍यानंतर अफगाणिस्‍तानमधून पलायन केलेले माजी राष्‍ट्रपती अशरफ घनी यांचे बंधू हशमत घनी हा तालिबानमध्‍ये सहभागी झाला आहे.

हशमत घनी याचा सहभागामुळे तालिबानला बळ मिळेल, असे मानले जात आहे. हशमत हे अफगाणिस्‍तान मधील परराष्‍ट्र धोरणाचे जाणकार आहेत. त्‍यांनी या पूर्वीच तालिबान्‍यांना समर्धन देणार असल्‍याचेही जाहीर केले होते.

अफगाणिस्‍ताचा राष्‍ट्रपती कोण होणार यासाठी तालिबान्‍यांमध्‍ये एकमत होत नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

हेलिकॉप्‍टर भरल्‍यानंतर नोटाच्‍या बॅग धावपट्‍टीवर टाकूनच पलायन

घनी यांनी चार कार भरुन नोटा हेलिकॉप्‍टरने अफगाणिस्‍तानमधून पलायन केले आहे, असे वृत्त रशियाच्‍य वृत्तसंस्‍थेने दिले होते.

हेलिकॉप्‍टर नोटांनी तुडूंब भरल्‍यानंतर नोटांनी भरलेल्‍या काही बॅग धावपट्‍टीवरच टाकण्‍यात आल्‍या होत्‍या, असेही या वृत्तात्त घेणार्‍या म्‍हटले होते.

अर्थशास्‍त्राचे अभ्‍यासक असणारे घनी हे अफगाणिस्‍तानचे १४ वे राष्‍ट्रपती हाेते.

२० सप्‍टेंबर २०१४ रोजी ते प्रथम राष्‍ट्रपती झाले. यानंतर २८ सप्‍टेंबर २०१९ रोजी झालेल्‍या राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीत ते विजयी झाली होते.

१९९६ ते २००१ या कालावधीमध्‍ये अफगाणिस्‍तानमध्‍ये तालिबानाचे राज्‍य होते.

११ सप्‍टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहतवादी हल्‍ला झाल्‍यानंतर अमेरिकेने तालिबान्‍याविरोधात कठोर कारवाई केली होती.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडीओ :साताऱ्याच्या रोहित ने चित्तथरारक रॅपलिंग करून सर केला शितकडा धबधबा |

Back to top button