Vedhika : Lip lock kiss सीन केलेल्या या अभिनेत्रीच्या बोल्डनेसची होतेय चर्चा

vedhika kumari
vedhika kumari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इमरान हाशमीचा हॉरर चित्रपट 'द बॉडी' मध्ये त्याच्यासोबत लिप लॉक किस सीन देऊन अभिनेत्री वेदिका कुमारी (vedhika ) चर्चेत आली होती. या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये तिचं काम फारसं चाललं नसल तरी साऊथ चित्रपटांमध्ये ती एक प्रसिद्ध चेहरा आहे.आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून बोल्ड फोटोशूटमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (vedhika )

वेदिकाचा जन्म महाराष्ट्रातील कन्नड कुटुंबात झाला. तिने किशोर नमित कपूर स्कूलमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी वेदिका मॉडेलिंग करत होती.

वेदिकाने 'मद्रासी' या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तमिळ व्यतिरिक्त वेदिका कुमारने मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. वेदिकाने आतापर्यंत सुमारे २० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

वेदिका चित्रपटसृष्टीत तिच्या उत्कृष्ट लूकसाठी ओळखली जाते. ती साडीतही अप्रतिम दिसते. वेदिका केवळ वेस्टर्न ड्रेसेजमध्येच नाही तर भारतीय कपड्यांमध्येही चांगली दिसते. वेदिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे मनमोहक फोटो शेअर करत असते.

स्पोर्ट्स ब्रा घालून फोटोशूट

वेदिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केलाय. या फोटोमध्ये ती फिटींग टू पीसमध्ये दिसते. स्पोर्ट्स ब्रा, पँट आणि कॅप घालून तिने फोटो शेअर केलाय. यामध्ये ती कंबर फ्लॉन्ट करताना दिसते. या फोटोमध्ये वेदिका खूपच सुंदर दिसत आहे आणि यामध्ये ती तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

❤️❤️??hottie ved, Very cool❤ , So beautiful ❤️ अशा कमे्टंस तिच्या या फोटोला मिळत असून नेटकऱ्यांनी तिच्यासाठी हार्य इमोजी शेअर केले आहेत.

तमिळ भाषेसह  वेदिका कन्नड, मल्याळम, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी बोलू शकते. वेदिकाला तिच्या चित्रपटातील अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vedhika (@vedhika4u)

यापूर्वी, अभिनेत्री वेदिकासाऊथचा सुपरस्टार थलपथी विजयच्या बीस्ट चित्रपटाच्या 'हलामिथी हबीबो'वर डान्स करून प्रसिद्धीच्याझोतात आली होती. वेदिकाने तिच्या अभिनय कारकिर्दीला तमिळ चित्रपट मद्रासीमधून सुरुवात केली. 'परदेसी' आणि 'काविया थलायवन'मध्ये अभिनय करून तिने यश मिळवले. तिने २०१९ च्या 'द बॉडी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ज्यामध्ये ती ऋषी कपूर आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत दिसली होती. द बॉडीमध्ये तिने इम्रानसोबत खूप बोल्ड सीन्स केले होते.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vedhika (@vedhika4u)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news