महिलांमध्ये वाढतोय धुम्रपानाचे प्रमाण; ताण कमी करण्यासाठी धूम्रपानाचा आधार | पुढारी

महिलांमध्ये वाढतोय धुम्रपानाचे प्रमाण; ताण कमी करण्यासाठी धूम्रपानाचा आधार

वर्षा कांबळे

पिंपरी : धूम्रपान किंवा मद्यपान या सवयी पुरुषांमध्ये जास्त प्रमाणावर आढळतात ही समजूत चुकीची ठरू लागली आहे. धूम्रपान ही एक अशी सवय आहे की जी सुटणे फार कठीण आहे. व्यसनमुक्ती केंद्रातील निरीक्षणानुसार व्यसनाधीन महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक धूम्रपान करीत असल्याचे समोर आले आहे.

दहा वर्षाच्या एका मुलीला मशेरी, तंबाखूचे व्यसन लागले. घरातील आई, आजी या मशेरी लावायच्या त्यांचे पाहून ती देखील व्यसनाधिन झाली. मोठी झाल्यानंतर लग्न झाले तरी हे व्यसन सुटले नाही. रात्री झोपेपर्यंत ती तंबाखू खात असायची. त्यामुळे सासरी व्यसनामुळे तिची चिडचिड वाढली. सासरच्यांनी तिला व्यसनमुक्ती केंद्रात आणले. हळहळू ती उपचारास प्रतिसाद दिला आणि आता ती व्यसनमुक्त झाली आहे.

‘कान्स’ संपल्याने ‘रडली’ दीपिका!

पंधरा वर्षाच्या मुलीला तिचे वडील सिगारेट ओढताना पाहून सिगारेट ओढण्याची इच्छा झाली. ती वयाच्या दहाव्या वर्षापासून सिगारेट ओढू लागली. वढील मुलांसाठी एक रोल मॉडेल असतात. त्यामुळे ती त्यांचे अनुकरण करता करता व्यसनाधिन झाली. पुढे ती गांजा देखील ओढू लागली. तिच्या घरच्यांनी शेवटी तिला व्यसनमुक्ती केंद्रात आणले.

सुरुवातीला उपचार घेणे हे तिला जड जात होते पण हळूहळू तिने प्रतिसाद दिला ती व्यसनमुक्त झाली. तिने पुढील शिक्षण देखील पूर्ण केले. आत लग्न करुन ती सुखी जीवन जगत आहे. या दोन घटना पाहता काही महिलांमध्ये शाळा आणि महाविद्यालयाच्या काळातूनच धूम्रपानाचे व्यसन लागते. ते पुढे जावून अनेक आजारांचे कारण बनते.

घोड्यावर बसवता येते, तसे खाली खेचता येते : संजय पाटील यांची आ. बाबर यांच्यावर टीका

सध्या कामाचा वाढता ताण कमी करण्यासाठी उच्चभ्रू घरातील महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. तसेच ‘वुई आर इक्वल’ ही संकल्पना रूजत असल्याने देखील चहाच्या टपर्‍यांवर देखील पुरुषांबरोबर महिला देखील उघड्यावर बिनदिक्कतपणे धुम्रपान करताना दिसतात. आता ही बाब सध्या सर्वसामान्य झाली आहे.

कार्पोरेट जगतातील महिलांना मिळणारा गलेलठ्ठ पगार आणि सुखविलासी जीवन जगण्याची सवय यामुळे 12 ते 14 तास कामात झोकून देतात. यामध्ये कामाचा ताण घालविण्यासाठी धुम्रपान यासारख्या गोष्टींचे व्यसन लागते. कामाचा ताण घालविण्यासाठी किंवा ग्रुपमध्ये फिट होण्यासाठी धुम्रपान केले जाते. मोठ्या पदावर काम करणार्‍या महिलांमध्ये घरची जबाबदारी आणि कामाचा ताण यामुळे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढत आहे.

कोल्हापूर : रूकडीत भंडारा उचलून धनगर समाजाने घेतली एकोप्याची शपथ

त्यासोबतच धूम्रपान किंवा मद्यपान करणार्‍या महिला केवळ मोठ्या शहरांमध्येच आढळतात, ही समजूत देखील चुकीची ठरते आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणार्‍या महिलांमध्येही मशेरीचे प्रमाण अधिक आहे. महिला गुटखा, तंबाखू, सिगारेट अशा अनेक प्रकारांच्या माध्यमातून तंबाखूचे सेवन करीत आहेत. यामध्ये गुटखा, पानमसाला या पदार्थांचे सेवन करणार्‍या महिलांचे प्रमाण
अधिक आहे.

मी गेली दहा वर्षे पान टपरी चालवित आहे. दरवर्षी धूम्रपान करणार्‍या महिलांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पूर्वी सिगारेटचे पाकीट विकत घेतले जायचे पण आता महिला चहा प्यायला आल्या की ऑफिसमधील पुरुष सहकार्‍याबरोबर बिनधास्तपणे सिगारेट ओढतात. त्यांच्यादृष्टीने हे एक स्टेटस समजले जाते.
                                           -मुकेश गुप्ता, पान विक्रेते

शहरातील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येणार्‍या व्यसनाधीन महिलांचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे चित्र आहे. धूम्रपान आणि धूम्रपानाच्या पुढे हुक्का (निकोटीन) यासारख्या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. व्यसनाधीन पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण हे दुपटीने वाढते. पुरुष एका दिवसांत चार सिगारेट ओढत असेल तर महिलांमध्ये ते आठ इतके वेगाने असते. पूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात येणार्‍या महिलांचे प्रमाण 5 किंवा 6 असायचे ते आता 8 किंवा 10 झाले आहे.
मनीषा धोपेश्वरकर, सल्लागार व लाईफ कोच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

 

Back to top button