‘या’ चित्रपटाचा जेह सुद्धा एक भाग : करिना | पुढारी

‘या’ चित्रपटाचा जेह सुद्धा एक भाग : करिना

पुढारी ऑनलाईन डेस्क

आमीर खान आणि करिना कपूर यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’चा ट्रेलर पाहून लोकांना त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. करिनानेही या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात शेअर करून आपला धाकटा चिरंजीव जहाँगीर ऊर्फ जेह हा सुद्धा या चित्रपटाचा एक भाग असल्याचे तिने म्हटले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, एक पँडेमिक, दोन लॉकडाऊन आणि त्यानंतर बाळ…माझा सर्वात खास चित्रपट…यासाठीही कारण माझा जेह बाबाही या चित्रपटाचा (माझ्या पोटात असल्याने) एक हिस्सा आहे. आम्हा दोघांना या चित्रपटाचा भाग बनवल्याबद्दल आमीर आणि अद्वैतचे आभार! ही एक अशी बाब आहे जिला मी नेहमीच चेरीश करीन! करिना कपूर या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दुसर्‍या वेळेस गर्भवती होती. जहाँगिरचा जन्म गेल्यावर्षी 21 फेब—ुवारीला झाला आहे.

Back to top button