‘कान्स’ संपल्याने ‘रडली’ दीपिका! | पुढारी

‘कान्स’ संपल्याने ‘रडली’ दीपिका!

पुढारी ऑनलाईन डेस्क

यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात दीपिका पदुकोन अक्षरशः झळकली. केवळ तिचा पोशाख किंवा लूक यामुळेच नव्हे तर ती या महोत्सवाच्या ज्युरींमध्येही सहभागी झालेली असल्याने तिच्यासाठी हा महोत्सव खास ठरला. आता हा महोत्सव संपल्यावर तिने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तिने सांगितले की ती व तिची टीम ‘कान्स’मधून बाहेर पडण्याची तयारी करीत आहेत आणि सगळेच रडत आहेत! खरे तर या रीलसाठी दीपिकाने व्हिडीओत एक ट्रेंडिंग फिल्टर लावला होता ज्यामुळे ती आणि सर्व टीम रडत असल्यासारखे दिसते! या मजेशीर व्हिडीओचा आनंद तिच्या चाहत्यांनी घेऊन अनेक प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या.

Back to top button