वैभव तत्ववादी स्टारर ग्रे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!

वैभव तत्ववादी स्टारर ग्रे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!

अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं 'ग्रे' या चित्रपटात दिसणार आहे. वैभव तत्ववादी स्टारर ग्रे चित्रपट एक रहस्यमय थरारक चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावकर यांनी केलं आहे. 'ग्रे' चित्रपटात वैभवने 'सिद्धांत' नावाच्या तरुणाची भूमिका साकारलीय.

या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर कलाकार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.

रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट आहे.

हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झी -५ प्रीमियर वर आपल्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news