Kolhapur Rendal : कोल्हापूरच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा, बॉडीबिल्डिंग स्पर्धेत जगात तिसरा

ब्रॉन्झ पदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी
ब्रॉन्झ पदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी
Published on
Updated on

रेंदाळ; संजय साळुंखे : (Kolhapur Rendal) उझबेकिस्तान येथे झालेल्या १२ व्या जागतिक वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक्स चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेमध्ये नाव पुकारण्यात आले, ते स्टेजवर आले, निवेदकाने साऊंड असे म्हटल्यावर त्या जागतिक व्यासपीठावर परदेस या चित्रपटातील लंडन देखा पॅरिस देखा और देखा जापान, सारे जगमें कही नही हैं दुसरा हिंदुस्थान, I love my INDIA या गीतावर त्यांनी शरीरसौष्ठव दाखवले. ही स्पर्धा पाहताना भारतीयांची छाती अभिमानाने फुगली, मानल रे पठ्या अशीच प्रतिक्रिया स्पर्धा पाहणाऱ्या लाखोजणांच्या मुखात होती. सुभाष पुजारी असे त्या शरीरसौष्ठवपटूचे नाव आहे.

त्यांनी कांस्य पदकाची कमाई करून पोलीस दलाचे नाव सातासमुद्रापार नेले. जागतिक व्यासपीठावर भारताचे नाव कायम ठेवणारे पुजारी हे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावचे सुपुत्र (Kolhapur Rendal) आहेत. सध्या महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेगत. सुभाष पुजारी यांच्या कर्तृत्वान कार्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Kolhapur Rendal : जबर इच्छाशक्ती च्या जोरावर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासून त्यांना व्यायामाची आवड होती. कॉलेज जीवनातही अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.

महाराष्ट्र पोलिस दलात त्यांची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. तेवढ्यावरच न थांबता अथक परिश्रम घेऊन जबर इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली.

नोकरीचा व्याप सांभाळत असताना त्यानी व्यायामात खंड पडू दिला नाही. कष्ट करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती असेल तर यश आपल्याकडे चालत येतं याच उत्तम उदाहरण म्हणजे सुभाष पुजारी.

बारा बारा तास सेवा बजावून उर्वरित वेळेत चार ते पाच तास व्यायाम करायचे या कष्टाचे फळ म्हणावे लागेल.

मास्टर भारत श्री या स्पर्धेत खुल्या गटात सुवर्णपदक

पंजाब लुधियाना येथे झालेल्या मास्टर भारत श्री या स्पर्धेत खुल्या गटात सुवर्णपदक पटकावून त्यांना भारत श्री चा मान मिळाला. पुजारी यांना वेध लागले ते जागतिक स्पर्धेत भारत देशाचा ठसा उमठवण्याचे.

देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि उझबेकिस्तान येथे होणाऱ्या १२ व्या जागतिक वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक्स चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.

महाराष्ट्र् पोलीस दलातून देशाचे नेतृत्व करण्याची संधी

महाराष्ट्र् पोलीस दलातून देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कर्तृत्वाचा झेंडा अखंडपणे फडकवत सुभाष पुजारी यांनी सातासमुद्रापार जागतिक पटलावरही आपला ठसा उमटवून स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करून देशाबरोबरच महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news