आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास भाजपसाठी मोठे कडवे आव्हान ठरणार आहे. गत महापालिका निवडणुकीतील प्रत्येक प्रभागनिहाय तिनही पक्षांच्या मतांची एकत्रित बेरीज केल्यास भाजपला तब्बल 51 जागांचा फटका बसू शकतो. आता येत्या निवडणुकीत प्रभाग रचनेपासून प्रत्यक्षात उमेदवारही वेगळे असणार असले तरी महाविकास महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत. (Pune Municipal Election)
महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध अन्य विरोधी पक्ष असाच सामना रंगणार आहे. सद्यातरी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र येऊनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. तर तीन सदस्यीय प्रभाग रचना होण्यापूर्वी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने आता तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढविण्याची आता भुमिका घेतली आहे. त्यासंबंधीचा अंतिम निर्णय अद्याप तरी झालेला नाही.
मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे. गत पालिका निवडणुकीत या तीनही पक्षांना मिळालेली एकूण मते आणि प्रभागनिहाय समीकरणे लक्षात महाविकास आघाडीचे पारडे जड राहील असा अंदाज या सर्व्हेनुसार व्यक्त होत आहे.
गत महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 98 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या या जागांसह मनसेने जिंकलेल्या 2 आणि एमआयएम यांची 1 जागा अशा 101 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांना मिळालेल्या मतांची एकत्र बेरीज केली असता तब्बल 53 ठिकाणी या तीनही पक्षांच्या मतांची बेरीज अधिक आहे. भाजपच्या 51 तर मनसे आणि एमआयएम प्रत्येकी 1 अशा 53 जागांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे अनेक प्रभागात या तीन पक्षांपैकी दोन पक्षांच्याच मतांची बेरीज भाजपपेक्षा अधिक आहे. त्यात बहुतांशपैकी राष्ट्रवादी व काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना यांचाच अधिक समावेश आहे. आता आगामी पालिका निवडणुकीत प्रभाग रचनेपासून उमेदवारांबरोबर सर्वच समीकरणे बदलणार आहेत. मात्र, तिनही पक्षांची एकत्रित ताकद सत्ताधारी भाजपसाठी कडवं आव्हान ठरणार असल्याचे चित्र आहे. (Pune Municipal Election)
2017 च्या पालिका निवडणुकीत भाजपला 37 टक्यांपेक्षा अधिक मते मिळाली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 23 टक्के, शिवसेना 14 टक्के, काँग्रेस 9 टक्के आणि मनसे 6. 44 टक्के अशी मते मिळाली होती. या मतांच्या टक्केवारीनुसार महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची मतांची एकत्रित टक्केवारी 46 टक्के इतकी होत आहे. त्यामुळे भाजपपेक्षा जवळपास ही मते 9 टक्के इतकी जास्त आहेत.
गत म्हणजेच 2017 च्या महापालिका निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविल्या होत्या, त्यात फक्त 50 ते 60 जागा काँग्रेस- राष्ट्रवादी यांनी आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढविल्या होत्या तर जवळपास शंभरहून अधिक जागांवर या दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. त्यामुळे मतांची विभाजनी होऊन तब्बल 25 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार पराभूत झाले होते. आता आता शंभर टक्के आघाडी झाल्यास त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होऊ शकणार आहे.
अ. क्र- प्रभाग क्र. -आघाडी/ महाविकास आघाडी
कळस – धानोरी
1) प्रभाग 1 (अ) – राष्ट्रवादी व काँग्रेस
2) प्रभाग 1 (ब) – राष्ट्रवादी व शिवसेना
विमाननगर – सोमनाथ नगर
3) प्रभाग 3 (अ) – राष्ट्रवादी व काँग्रेस, सेना
4) प्रभाग 3 (ब) – राष्ट्रवादी व काँग्रेस
5) प्रभाग 3 (क) – काँग्रेस व शिवसेना
6) प्रभाग 3 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
वडगावशेरी – कल्याणीनगर
7) प्रभाग 5 (ब) – राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस
8) प्रभाग 5 (क) – राष्ट्रवादी व शिवसेना, काँ
9) प्रभाग 5 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
येरवडा
10) प्रभाग 6 (क) – शिवसेना व काँग्रेस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – वाकडेवाडी
11) प्रभाग 7 (अ) – काँग्रेस – राष्ट्रवादी
12) प्रभाग 7 (ब) – काँग्रेस व राष्ट्रवादी
13) प्रभाग 7 (क) – शिवसेना व राष्ट्रवादी
14) प्रभाग 7 (ड ) – काँग्रेस व राष्ट्रवादी
औंध – बोपोडी
15) प्रभाग 8 (अ) – राष्ट्रवादी व काँग्रेस
16) प्रभाग 8 (ब) – काँग्रेस व राष्ट्रवादी
17) प्रभाग 8 (क) – काँग्रेस व राष्ट्रवादी
18) प्रभाग 8 (ड) – राष्ट्रवादी व काँग्रेस
बाणेर – बालेवाडी – पाषाण
19) प्रभाग 9 (अ) – राष्ट्रवादी व शिवसेना
रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर
20) प्रभाग 11 (ब) – राष्ट्रवादी व शिवसेना
डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी
21) प्रभाग 14 (अ) – राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस
22) प्रभाग 14 (ब) – शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी
23) प्रभाग 14 (क) – राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस
24) प्रभाग 14 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
कसबा पेठ – सोमवार पेठ
25) प्रभाग 16 (ड) – काँग्रेस व शिवसेना
रास्ता पेठ – रविवार पेठ
26) प्रभाग 17 (ब) – शिवसेना व राष्ट्रवादी
खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ
27) प्रभाग 18 (अ) – शिवसेना व काँग्रेस
28) प्रभाग 18 (ब ) – काँग्रेस व शिवसेना
29) प्रभाग 18 (क) – काँग्रेस व शिवसेना
30) प्रभाग 18 (ड) – शिवसेना व काँग्रेस
लोहिया नगर – कासेवाडी
31) प्रभाग 19 (ब) – अपक्ष (काँग्रेस) व शिवसेना
32) प्रभाग 19 (क) – काँग्रेस व राष्ट्रवादी
कोरेगाव पार्क – घोरपडी
33) प्रभाग 21 (क) – राष्ट्रवादी व शिवसेना
हडपसर गावठाण – सातववाडी
34) प्रभाग 23 (क) – राष्ट्रवादी व शिवसेना
35) प्रभाग 23 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
– वानवडी
36) प्रभाग 25 (अ) – राष्ट्रवादी व काँग्रेस
37) प्रभाग 25 (ब) – राष्ट्रवादी व काँग्रेस
– महंम्मदवाडी- कौसर बाग
38) प्रभाग 26 (ड) – शिवसेना – राष्ट्रवादी
– कोंढवा खुर्द – मिठानगर
39) प्रभाग 27 (ड) – राष्ट्रवादी व काँग्रेस
– नवी पेठ – पर्वती
40) प्रभाग 29 (अ) – शिवसेना व राष्ट्रवादी
41) प्रभाग 29 (ब) – शिवसेना व राष्ट्रवादी
जनता वसाहत – दत्तवाडी
42) प्रभाग 30 (अ) – राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस
43) प्रभाग 30 (क) – राष्ट्रवादी व शिवसेना
44) प्रभाग 30 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
वडगाव धायरी – वडगाव बुद्रुक
45) प्रभाग 33 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
सहकारनगर – पद्मावती
46) प्रभाग 35 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
मार्केटयार्ड – लोअर इंदिरानगर
47) प्रभाग 36 (ड) – राष्ट्रवादी व शिवसेना
अप्पर सुपर – इंदिरा नगर
48) प्रभाग 37 (अ) – शिवसेना व राष्ट्रवादी
बालाजीनगर – राजीवगांधी नगर
49) प्रभाग 38 (ब) – राष्ट्रवादी व शिवसेना
50) प्रभाग 38 (क) – राष्ट्रवादी व शिवसेना
धनकवडी – आंबेगाव पठार
51) प्रभाग 39 (क) – राष्ट्रवादी व शिवसेना
कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
52) प्रभाग 41 (क) – शिवसेना व राष्ट्रवादी
53) प्रभाग 41 (ड) – शिवसेना व काँग्रेस