Surya Movie : ‘सुर्या’ या दिवशी चित्रपटगृहात भेटीला

surya movie
surya movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक दमदार ॲक्शनपट बनवले आहेत. सतत नावीन्याचा शोध घेत नवनवीन प्रयोग करणारी मराठी चित्रपटसृष्टीही 'सुर्या' हा नवीन ॲक्शनपॅक्ड चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. (Surya Movie ) राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स, डीके निर्मित 'सुर्या' या ॲक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. 'सुर्या'चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Surya Movie)

'मी कोणाच्या नादी लागत नाही आणि ज्याच्या लागतो तो उरत नाही', अशी धमकी देत 'सुर्या'ने त्याच्या शत्रूंच्या मनात कशी दहशत निर्माण केली आहे? आपलं प्रेम आणि कुटुंब यांच्या संरक्षणासाठी 'सुर्या' नेमकं काय करतो? शक्ती आणि युक्तीच्या बळावर कोणत्या नीतीचा अवलंब करून 'सुर्या'त्याच्या शत्रूंना कसं नेस्तनाबूत करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज प्रेक्षकांना मिळणार आहेत. विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर रंगणारं सूडनाट्य प्रेक्षकांना 'सुर्या' चित्रपटात पहायला मिळणार आहे. सामान्य माणूस आणि सिस्टिम यांचा संघर्ष आणि एकजुटीच्या ताकदीतून लढा कसा जिंकता येतो? हे दाखवताना त्याला प्रेमकथेची, कौटुंबिक भावनिक नात्याची किनार आहे.

अभिनेता प्रसाद मंगेश याच्यासोबत अभिनेत्री रुचिता जाधव नायिकेच्या रूपात दिसणार आहे. या दोघांसोबत या चित्रपटात हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णु, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, देवशी खांडुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

उगवला पराक्रमी सुर्या सुर्या, मन गुंतता गुंतता, रापचिक रापचिक कोळीणबाई, मी आहे कोल्हापूरची लवंगी मिरची, बेरंग जवानी अशी वेगवेळ्या जॉनरची पाच गाणी चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान, मंगेश ठाणगे, प्रशांत हेडव यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. सुखविंदर सिंग, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, राजा हसन, ममता शर्मा, कविता राम, खुशबू जैन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहे.

या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केलीय. सहनिर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत. कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु. एस. राव यांचे आहे. ॲक्शन डिरेक्टर अब्बास अली मोगल आणि मोझेस फर्नांडिस आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news