सांगली : जिल्ह्यात १९ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या | पुढारी

सांगली : जिल्ह्यात १९ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस दलातील 19 पोलिस अधिकार्‍यांच्या बुधवारी जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बदल्यांचा हा आदेश जारी केला.

नियंत्रण कक्षातील पोेलिस निरीक्षक अरविंद बोडके यांची सुरक्षा शाखेत बदली झाली आहे. त्यांच्याकडे मुख्यालयातील पोलिस उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सुधीर भालेराव यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली असून त्यांच्याकडे दहशतवादविरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक गजानन कांबळे यांची जिल्हा विशेष शाखेत, इस्लामपुरातील प्रवीण साळुंखे यांची पलूस पोलिस ठाण्यात, अनिल जाधव यांची जतला बदली झाली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील युवराज सरनोबत यांची कुंडल पोलिस ठाण्यात, मिरज शहरचे नितीन सावंत यांची भिलवडीला, तर तेथील कैलास कोडग यांची मुख्यालयातील वाचक शाखेत बदली झाली आहे. जत ठाण्यातील महेश मोहिते यांची कोकरूड पोलिस ठाण्यात, विश्रामबागचे सिकंदर वर्धन यांची आटपाडीला, कोकरुडचे ज्ञानदेव वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेत, जतचे विनोद कांबळे यांची सांगली शहरला, नियंत्रण कक्षातील सागर वरूटे यांची इस्लामपूरला बदली झाली आहे.

शिराळा ठाण्यातील उपनिरीक्षक अविनाश वाडेकर यांची मिरज शहरला, संजयनगरचे महेश डोेंगरे यांची शिराळ्याला, मिरज महात्मा गांधी चौक ठाण्यातील सोमनाथ कचरे यांची कवठेमहांकाळला, आष्ट्याचे दीपक सदामते यांची संजयनगरला, सांगली ग्रामीणचे विद्यासागर पाटील यांची मिरज शहरला, तर मिरज शहरचे जगन्नाथ पवार यांची इस्लामपूर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. बदली झालेल्या अधिकार्‍यांना तातडीने हजर होण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Back to top button