Adipurush : प्रभासकडून गुड न्यूज, आदिपुरुष यादिवशी येणार

prabhas aadipurush film
prabhas aadipurush film

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार प्रभासच्या फॅन्ससाठी मोठी खुशखबर आहे. महाशिवरात्रीच्या महापर्वावर चित्रपट आदिपुरुषची (Adipurush) रिलीजची तारीख घोषित करण्यात आलीय. त्यामुळे प्रभासच्या फॅन्सना प्रतीक्षा लागून राहिलीय. प्रभासने या Adipurush चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिलंय, आदिपुरुष वर्ल्डवाईड रिलीज १२ जानेवारी २०२३.

प्रभासच्या या पोस्टवर फॅन्स भरभरून कमेंट करत आहेत. तर अभिनेत्री कृती सेनॉननेदेखील इन्स्टाग्रामवर आदिपुरुषचे एक पोस्टर शेअर केले आहे. तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलंय- १२ जानेवारी, २०२३ ला ३डीमध्ये जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होईल, आदिपुरुष. आदिपुरुष चित्रपट ३डीमध्ये रिलीज केला जाईल. या चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान, कृती सेनॉन, सनी सिंह दिसणार आहेत.

हा चित्रपट ओम राउत यांनी दिग्दर्शित केला आहे. जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झालीय, तेव्हापासून तो चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून असं पहिल्यांदा घडत आहे की, प्रभास, सैफ अली खान, कृती सेनॉन एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाची कहाणी खूप इंटरेस्टींग आहे. साऊथमध्येच नाही तर बॉलीवूडमध्येही या चित्रपटाची चर्चे होतेय.

प्रभासकडे सध्या खूप सारे चित्रपट आहेत. प्रभासचे चित्रपट आणि अभिनय इतकं उत्कृष्ट असतो की, पडद्यावर येताच चित्रपट हिट ठरतात. आता 'आदिपुरुष' पडद्यावर काय धुमाकूळ घालतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news