पुढारी ऑनलाईन : सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी बावकर हिची 'शीतली' ही व्यक्तिरेखा प्रसिध्द ठरली होती. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीची भूमिका ती नव्या मालिकेत साकारणार आहे.
कुसुम ही मालिका बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे.
आपल्या आई-वडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी ती सतत तत्पर असते. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या ती लीलया पार पाडते. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज? असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली.
दुनियेसाठी खपायचं आणि आईबापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते.
२००१ साली हिंदीमध्ये 'कुसुम' नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली.
आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.
बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून 'कुसुम' या मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत.
सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते.
'कुसुम' ही मालिका ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेदेखील वाचलंत का? –