Shahrukh Khan : शाहरूखचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो? | पुढारी

Shahrukh Khan : शाहरूखचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो?

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवुडच्या बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान (Shahrukh Khan) सध्या चित्रपटांच्या बाबतील मागे गेला असला तरी, त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून चांगलाच सक्रिय असतो.

तो कोणत्या ना कोणत्या कारणाने मीडियाच्या केंद्रस्थानी असतोच. यावेळी तो मीडियाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचं कारण आहे… ते म्हणजे शाहरूख खानचं ‘मन्नत’ नावाचं आलिशान घर.

सर्वांनाच शाहरूखच्या घराची सैर करायची असते. पण, प्रत्येकाला शक्य होतेच असं नाही. शाहरूखचं हे मन्नत नावाचं आलिशान घर मुंबईच्या ब्रांद्रासारख्या ठिकाणी समुद्रकिनारी बांधण्यात आलेलं आहे.

जेव्हा शाहरूखचा बर्थ-डे असतो, त्यावेळी याच घरासमोर त्याचे असंख्य जमा होत असतात. त्यावेळी हा बाॅलिवुडचा किंग खानही आपल्या बंगल्याच्या गॅलरीत येऊन चाहत्यांना अभिवादन करत असतो.

शाहरूखच्या ‘मन्नत’ बंगल्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या या आलिशान बंगल्याची किंमत २०० करोडपेक्षा जास्त आहे, अशी माहिती समोर आलेली आहे.

आता हा बंगला इतका आकर्षक असण्याचं कारण म्हणजे शाहरूखची पत्नी गौरी खान ही एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे. आणि तिने स्वतः मन्नत हे घराचे इंटेरिअर डिझाईन केलेलं आहे.

या बंगल्यात बेडरूम, जिम, लायब्ररी, स्विमिंग पूल, यासांरख्या कित्येक सोईसुविधा आहेत. शाहरुखच्या या घराला जगातल्या सुंदर घरांपैकी एक घर मानलं जातं.

शाहरूख खानसारखं मन्नत नावाचं घर आपल्याकडे असावं, असं बाॅलिवुडमधील प्रत्येक सिताऱ्याची इच्छा असते. कित्येक अभिनेत्यांनी त्याच्या घराचं कौतुक केलं आहे. पण, शाहरूखने या परिस्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा स्ट्रगल केलेला आहे.

टीव्ही शोपासून ते चित्रपटांतील मुख्य अभिनयापर्यंत शाहरूखने (Shahrukh Khan) खूप कष्ट उपसले आहेत. तेव्हा कुठे तो बाॅलिवुडविश्वातील सर्वांत मोठा सितारा झालेला आहे. ही समृद्धी त्याने आपल्या स्वतःच्या हिमतीवर मिळवली आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button