shahid kapoor : नवं नवं लग्न झाल्यानंतर मीराला शाहीदसोबतचं मोडायचं होतं लग्न

meera rajput-shahid kapoor
meera rajput-shahid kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा हँडसम हंक शाहीद कपूर सध्या चर्चेत आहे. कारण, त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'जर्सी' पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. हे स्टार सध्या आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. यादरम्यान त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केलाय. हा किस्सा ऐकून कुणालाही विश्वास नाही बसणार!

शाहीद कपूरने दिल्लीची मुलगी मीरा राजपूतसोबत अरेंज मॅरेज केले आहे, हे सर्वांना माहीत आहे. चाहत्यांना त्यांची जोडीही खूप आवडते. अनेकदा मीरा आणि शाहिद चाहत्यांना कपल गोल देताना दिसतात. आता शाहीदने असा खुलासा केला आहे की, हे ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या परफेक्ट कपलमध्येही हे घडू शकते यावर त्यांचा विश्वास बसत नाही.

वास्तविक, एका मुलाखतीत शाहीदने सांगितले होते की, 'जेव्हा त्याचे आणि मीराचे नवीन लग्न झाले होते, तेव्हा एक अतिशय मजेदार गोष्ट घडली. मी मीराला 'उडता पंजाब' रिलीज होण्याआधीच दाखवायला घेतलं. एडिटिंग रूममध्ये आम्ही चित्रपट पाहिला. मी चित्रपटासाठी निघालो होतो, म्हणून मीरालाही विचारलं, तू येशील का चित्रपट पाहायला? तर ती म्हणाली, हो येईन.'

शाहीदने सांगितले की, मीरा चित्रपट पाहत असताना त्याच्या शेजारी बसली होती. पण, इन्टरव्हलदरम्यान ती माझ्यापासून दूर जात होती. मला आश्चर्य वाटले की नेमकं काय झालं. आमचे नुकतेच लग्न झाले होते. आम्ही एकमेकांना फारसे ओळखतही नव्हतो. यावर मीराने त्याला विचारले की, तुझं ऑनस्क्रीनसारखचं कॅरेक्टर आहे का? आणि त्याला म्हणाली, 'मला तुझ्यासोबत रहायचे नाही.'

मीराचा हा बालिशपणा शाहीदेने सर्वांशी शेअर केला. पण, आज हे कपल सर्वात क्यूट कपलपैकी ओळखलं जातं. दोघांना दोन मुले आहेत. शाहीदचा 'उडता पंजाब' हा ड्रग्जवर आधारित चित्रपट होता. यामध्ये शाहिद कपूरने ड्रग ॲडिक्ट सुपरस्टारची भूमिका साकारली होती.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news