Rashmika Mandana : रश्मिकाला वाढदिनी मिळालं मोठं गिफ्ट, नेटकरी म्हणाले, "लपवून ठेवायची..."

पुढारी ऑनलाईन डेस्क
‘पुष्पा’ची ‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदानाने ५ एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा केलाय. ती २६ वर्षांची झालीय. वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रश्मिकाने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये १४ चित्रपट केले आहेत. मात्र, सुरुवातीच्या चार-पाच चित्रपटांनंतरच संपूर्ण देशात तिने चाहतावर्ग निर्माण केला होता. वाढदिवसादिवशीच तिला मोठं गिफ्ट मिळालंय.
साऊथ सुपरस्टार विजय थलापतीसोबत झळकणार
एका रिपोर्टनुसार, रश्मिकाला साऊथ सुपरस्टार थलपथी विजयच्या आगामी चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या संदर्भातील एक ट्विटदेखील शेअर केले आहे या ट्विटमध्ये #Thalapathy66 Heroine @iamRashmika 90% Confirmed ❤ #Beast #BeastHindiTrailer #BeastModeON #BeastMovie असं लिहिलं आहे.

या घोषणेनंतर, चाहते दोघांना एकत्र पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु अद्याप चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची पूर्ण घोषणा केलेली नाही.
इतकंच नाही तर अभिनेत्री रश्मिका यासोबत आणखी एक भेट मिळाली आहे. वास्तविक, ही अभिनेत्री दिग्दर्शक हनु राघवपुडी यांच्या चित्रपटातही दिसणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत दक्षिणेचा अभिनेता दुल्कर सलमान दिसणार आहे. त्याचवेळी, अभिनेत्रीच्या वाढदिवशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातून रश्मिकाचा लूक काढून टाकला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री रश्मिका दिसत आहे, जी या चित्रपटात आफरीन नावाच्या काश्मिरी मुस्लिम मुलीची भूमिका साकारत आहे. हे पोस्टर शेअर करताना रश्मिका जळत्या कारसमोरून चालताना दाखवण्यात आली आहे.

याआधी रश्मिका अल्लू अर्जुनसोबत पुष्पा या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने श्रीवल्लीची भूमिका केली होती. आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे आणि लवकरच ती बॉलिवूडमध्येही प्रवेश करणार आहे.
५ एप्रिल, १९९६ मध्ये कर्नाटकातील विराजपेटमध्ये जन्मलेल्या रश्मिकाने ‘मास्टर ऑफ सायकॉलॉजी’ ही पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाचे वडील मदन मंदाना हे क्लार्कची नोकरी करीत होते. २०१६ मध्ये ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून रश्मिकाने करिअर सुरू केले. त्यापूर्वी तिने कॉलेजमध्ये असताना ‘क्लीन अँड क्लिअर फेस २०१४ ही स्पर्धा जिंकून मॉडेलिंग सुरू केले होते.

केवळ चार कोटीत बनलेल्या ‘किरिक पार्टी’ चित्रपटाने ५० कोटी रुपयांची कमाई केली होती आणि २०१६ मध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला होता. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले आणि गुगलने २०२० मध्ये तिला ‘नॅशनल क्रश’ घोषित केले होते!
हेही वाचा :
- Sai Tamhankar : ‘दौलतराव सापडला’ सई ताम्हणकरची ‘ती’ पाेस्ट चर्चेत …
- Urvashi Rautela Oops moment : अन् उर्वशी रौतेलाचा गाऊन घसरत गेला (Video)
- RRR ने जमवला ९०० कोटींचा गल्ला, टीमला दिली सोन्याची नाणी
#Thalapathy66 Heroine @iamRashmika 90% Confirmed ❤#Beast #BeastHindiTrailer #BeastModeON #BeastMovie pic.twitter.com/G0LtnYIqFr
— ᴊᴇʀᴏᴍᴇ (@JudeJerome6) April 4, 2022