दिल दोस्ती दुनियादारी फेम सखी गोखले दिली गुड न्यूज | पुढारी

दिल दोस्ती दुनियादारी फेम सखी गोखले दिली गुड न्यूज

पुढारी ऑनलाईन: दिल दोस्ती दुनियादारी फेम आणि मराठी अभिनेत्री सखी गोखले सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सखी गोखले गेल्या काही महिन्यापुर्वी अभिनेता सुव्रत जोशी याच्याशी विवाह बंधनात अडकली. तर सध्या सखीने गुड न्यूज दिली आहे.

अभिनेत्री सखी गोखले गेल्या महिन्यात तिच्या इंन्स्टाग्रामवर लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती लंडनच्या रॉयल कॉलेजच्या समोर मोजक्या काही मित्रासोबत दिसत आहे. यावेळी तिने लाल रंगाच्या ड्रेसवर एक जॅकेट परिधान केले आहे. हा फोटो शेअर करत तिने लंडनच्या रॉयल कॉलेजमधून मास्टर डिग्री मिळवली असल्याची खुलासा केला आहे. ही गुड न्यूज तिने सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांना वेगवेगळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘मास्टर ऑफ आर्ट्स (रॉयल कॉलेज ऑफ आर्ट) क्युरेटिंग कंटेम्पररी आर्ट 👩🏻‍🎓 teehee!…’ असे लिहिले आहे. याशिवाय तिने शेअर केलेल्या फोटोंत लंडनमधील तिच्या काही मित्र- मैत्रीण दिसत आहेत. यातील खास म्हणजे, सर्वांनी एकाच रंगाचे कॉलेजचा युनिफार्म परिधान केला आहे.

हे फोटो शेअर होताच चाहत्यासह अनेक मराठी कालाकारांनी कॉमेन्टस केल्या आहेत. यात खास करून मराठी अभिनेत्री सायली संजीवने ‘❤️ Sakhu 😘😘😘😘’ अशी हटके कॉमेन्टस केली आहे. याशिवाय काही चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करत हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. यात दरम्यान तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल काही चाहत्यानी प्रश्न उपस्थित केले आहेत. यात त्यांनी गुड न्यूज दिली म्हणजे नेमकं झालं आहे?. तर सखी आई होणार आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अभिनेते मोहन गोखले याच्या निधनानंतर आई शुभांगी गोखले यांनी एकटीने सखीचा सांभाळ केला. सखी अवघ्या ६ वर्षांची असतानाच मोहन यांनी जगाचा निरोप घेतला. सखीने दहावी पर्यंतचे शिक्षण सह्याद्री स्कूल येथून पार पाडले आहे. यानंतर ती रूपारेल कॉलेजमध्ये शिकली. आई शुभांगी गोखलेंनी कॅमेरा गिफ्ट केल्यामुळे सखीला फोटोग्राफीमध्ये रुची निर्माण झाली. यानंतर तिने भारती विद्यापीठ पुणे येथून फॅशन आणि फाईन आर्ट्स फोटोग्राफीचं शिक्षण घेतले.

सखीने करिअरची सुरुवात हिंदी जाहिरातींमधून केली. यानंतर तिने २०१३ मध्ये ‘रंगरेझ’ या हिंदी चित्रपटात ‘वेणू ‘नावाची छोटी भूमिका साकारली.‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत तिने रेश्मा इनामदार म्हणून भूमिका साकारली. ही मालिका संपल्यानंतर सखीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातही काम केले. यानंतर सखी पुढील शिक्षणासाठी युनायटेड किंग्डमला गेली. तिथे मास्टर इन आर्ट क्युरेशनचा कोर्स केला. यानंतर तिने लंडनमध्ये मास्टर्सची पदवी मिळविली. ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या सेटवर अभिनेता सुव्रत जोशी तिला भेटला आणि दोघांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपातंर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनी लग्न केलं.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

Back to top button