रुबीना दिलैक :’जो रुबिना से जले, वो जरा साइड से चले’

रुबीना दिलैक :’जो रुबिना से जले, वो जरा साइड से चले’
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'बिग बॉस १४'ची विजेती आणि अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) सध्या मालदीवमध्ये पती अभिनव शुक्लासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. नुकतेच अभिनव शुक्लाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही मालदीवला पोहोचले आहेत. मालदीवमधील रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला याच्या काही हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतेच रुबीनाने आपल्या इंन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या बिकिनीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर रुबीनाचा रेड हॉट जलवा पाहायला मिळत आहे. याशिवाय रूबीनाने पती अभिनवसोबत रोमॉटिक गाण्यावर डान्स देखील केला आहे.

'उदारियां' या गाण्यावर धरला ताल

या व्हिडिओमध्ये रुबीनाने लाल रंगाचा ड्रेस तर अभिनव शुक्लाने शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. रुबीना आणि अभिनव यांनी दोघांनी सतिंदर सरताजच्या 'उदारियां' या गाण्यावर समुद्र किनाऱ्यावर रोमँटिक डान्स केला आहे. यानंतर डान्सवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना रुबीनाने 'ना गल मेरे बस दी राही.' अशी कॅप्शन लिहिली आहे.

रुबिनाने आपल्या पतीसोबत बीचवर हातातहात घालून फिरताना दिसत आहेत. या फोटोंनी चाहत्यांना भूरळ घातली आहे. शेअर झालेल्या व्हिडिओत रूबीना आणि अभिनव यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.

रेड बिकनीत रूबीना

मालदिवच्या समुद्रकिनारी रुबिना लाल रंगाच्या बिकिनीसोबत सनग्लासेस, स्कार्फने बांधलेले केस, स्टेटमेंट चोकर नेकपीस घातलेली दिसत आहे. हा फोटो रूबीनाने विना मेकअप शेअर केला आहे. या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अनेक चाहत्यांनी कॉमेंन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एकाने 'जो रुबिना से जले, वो जरा साइड से चले', तर दुसऱ्या एकाने 'लाल मखमली '. अशा कॉमेंन्टस लिहिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनी प्रेमाचा आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.

रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्या नात्यात मध्यंतरी अनेक अडचणी आल्या होत्या; पण दोघांनी हार मानली नाही. त्यांच्या नात्यास आणखी एक संधी देण्यासाठी त्यांनी बिग बॉसमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या नात्यातील दरी मिटवली.

दोघांमधील नातं आता आणखी घट्ट झालं आहे. दोघेही आता पुन्हा आपल्या विवाहित जीवनाचा आनंद मालदिवमध्ये घेत आहेत.

रुबीना 'शक्‍त‍ि- अस्‍त‍ित्‍व के एहासास की'मालिकामध्ये प्रमुख सौम्याची भूमिका साकारली आहे. तिला या भूमिकेसाठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. रूबीना नेहमी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करून सक्रिय असते.

रुबीना लवकरच 'अर्ध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. यात पलाश मुच्छल दिग्दर्शक म्हणून बॉलिवुडमधे पहिल्यांदा पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात रुबीनासोबत 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेता हितेन तेजवानी आणि कॉमेडियन राजपाल यादव यांनी भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news