सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली आर्यनला म्‍हणाली... | पुढारी

सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली आर्यनला म्‍हणाली...

पुढारी ऑनलाईन :

क्रुझ रेव्ह पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानचे समर्थन करण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज समोर येत आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीत सोमी अली या अभिनेत्रीच्‍या नावाचाही समावेश झाला आहे. सोमी अली ही सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे.

सोमी अली
सोमी अली

आर्यनला सोडून देण्याची मागणी सोमी अली हिने केलीय. ड्रग्ज आणि वेश्यावृत्तीला गुन्हा मानणे बंद केलं जावं,  सोमीने आर्यनला निर्दोष असल्‍याचे सांगत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने आर्यनचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिलीय.

सोमीने लिहिलंय, ‘कुठला मुलगा आहे, ज्याने ड्रग्ज घेतलं नसेल? या मुलाला घरी जाऊ द्या. वेश्यागमन सारखे ही ड्रग्जची नशा कधी संपू शकत नाही.  हा गुन्हा आहे, असे मानणे बंद केलं जावं. इथे कुणीही संत नाही.’

दिव्या भारतीसोबत घेतलं होतं ड्रग्‍ज

सोमीने पुढे लिहिलंय- मी १५ वर्षांची होते, तेव्हा ड्रग्‍ज घेतलं होतं. आंदोलन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, दिव्या भारतीसोबत ड्रग्ज घेतले हाेते. याचा मला कुठलाही पश्चाताप नाही, असेही तिने म्‍हटलं आहे.

आर्यनचा वापर केला जातोय : सोमी

सोमीचं म्हणणं आहे की, तपास यंत्रणा आपला मुद्दा सिध्द करण्यासाठी आर्यनचा वापर करत आहे.  अशा गोष्टींऐवजी तपास संस्‍थांनी बलात्कारी आणि मारेकऱ्यांना पकडण्यावर आपले लक्ष केंद्रित केलं तर?! …अमेरिकेत १९७१ पासून ड्रग्‍जविरोधात संघर्ष करत आहे. तेथे ड्रग्ज सहजतेने उपलब्ध होते. शाहरुख आणि गौरीसोबत प्रार्थना. त्यांच्यासाठी मन दुखतं. आर्यन, तू कुठलीही चूक केलेली नाहीस. न्याय मिळेल.’, असेही तिने म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

Back to top button