प्राजक्ता गायकवाड हिचा मराठमोळा रुबाब पाहिला का?

प्राजक्ता गायकवाड हिचा मराठमोळा रुबाब पाहिला का?
Published on
Updated on

छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता गायकवाड हिला लोकप्रियता मिळाली. तिने या मालिकेत 'येसू बाई' यांची व्यक्तीरेखा साकारली होती. या मालिकेतून प्राजक्ता गायकवाड घराघरांत पोहोचली. ही मराठमोळी अभिनेत्री सोशल मीडियावरही ॲक्टीव्ह असते. ती तिचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. आतादेखील तिने काही सुंदर फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये प्राजक्ता मराठमोळ्या लूकमध्ये दिसतेय. तिचा मराठमोळा रूबाब पाहून तुम्हा म्हणाल…'मराठी मुलगी म्हणजे कणखरपणा.' प्राजक्ताने नुकतचं एक नवं फोटोशूट केलं आहे. प्राजक्ताने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या साडीवर तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. या साडीत तिचे सौंदर्य फार खुलून दिसत आहे.

यात तिने हिरव्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी परिधान केली होती."आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर, नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार," असे कॅप्शन तिने या फोटोला दिली होती.

फिटनेस फ्रिक आहे प्राजक्ता

प्राजक्ता फिटनेसबाबत कायमच दक्ष असते. मध्यंतरी, तिचा डंबेल्स उचलून व्यायाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अभिनयासोबत फिटनेस देखील महत्त्वाचा आहे. शूटिंग करून रात्री दहा वाजता घरी आले, तरी जिममध्ये जाते. असं प्राजक्ता म्हणतेय. प्राजक्ताला नृत्याची देखील आवड आहे.

अलका कुबलसोबतच्या वादामुळे आली होती चर्चेत

साताऱ्यात 'माझी आई काळुबाई' या मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला होता.

यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी ही मालिका अर्ध्यातूनच सोडली. अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच तु तु मै मै झाली होती.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनंतर 'आई माझी काळुबाई' या मालिकेतही ती झळकली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news