Katrina Kaif ची ऑरेंज साडीत परफेक्ट फिगर - पुढारी

Katrina Kaif ची ऑरेंज साडीत परफेक्ट फिगर

मुंबई; पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ( Katrina Kaif ) आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच कॅटरिना प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान कॅटरिना सूर्यवंशी चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत स्पॉट झाली आहे.

कॅटरिना कैफ( Katrina Kaif ) बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. याच दरम्यान विक्कीने एका मुलाखतीत आम्ही लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली. यानंतर मात्र, कॅटरिना आणि विक्कीच्या नाते जग जाहीर झाले. परंतु, सध्या कॅट आणि विक्की दोघेही आपआपल्या कामात बिझी आहेत.

दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॅटरिना फिल्मसिटीमध्ये दिसली. यावेळी कॅटने फॅशन डिझायनर सब्यासानी डिझाईन केलेली साडी परिधान केली होती. यावेळी सोनेरी रंगाचे बॉर्डर असणारी ऑरेंज रंगाची साडी कॅटवर खुलून दिसत होती.

यासोबतच तिने फ्लोरल हॅवी एंब्रॉयडरी केलेले लांब हाताचे ब्लॉउज परिधान केले होते. या लूकमध्ये कॅट खूपच मनमोहक दिसली असून तिने घातलेल्या ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कॅटने कमीत-कमी मेकअपसोबत कपाळावर छोटीशी टिकली लावत केस मोकळे सोडले आहेत. कॅटरिनाचा पारंपारिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ विरल भयानी अकाउंटवर व्हायरल होताच अनेक चाहत्यांनी कॉमेंन्टसचा पाऊस पडला आहे. यात एकाने ‘ मराठमोळ्या लूकमध्ये कॅट खूपच ग्लॅमरस दिसत आहेस.’ तर दुसऱ्या एका युजर्सने ‘विक्कीसोबत लग्न केव्हा करणार?’ असा प्रश्न विचारला आहे. कॅटरिनाचा परफेक्ट फिगरवाला लूक चाहत्यांना भावला आहे.

याआधी कॅटने दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल रंगाच्या लेहेंग्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोही कॅट खूपच सुंदर दिसत होती.

कॅटरिना कैफने आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे आज २१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे.

कॅटरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘फोन भूत’, ‘सूर्यवंशी’, ‘टायगर 3’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय दिग्दर्शक गुरमीत सिंग यांच्या चित्रपटात कॅटरिना अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करताना दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

(video: viralbhayani, manav.manglani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button