पुढारी ऑनलाईन
टेनिस स्टार लिएंडर पेस-किम शर्माची लव्ह स्टोरी सर्वश्रुत झालीय. दोघे एकत्र पार्टीज, वर्कआउट प्रॅक्टिस, हॉलिडेला जाताना दिसतात. आता या कपलने आपल्या एका मित्राच्या लग्नातदेखील एकत्र हजेरी लावली. लिएंडर पेस-किम सोबतचे या वेडिंग फंक्शनमधील काही फोटोज शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये किम आणि लिएंडर ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये दिसत आहेत. किमने ऑरेन्ज कलरचा लहंगा परिधान केला आहे. मोती आणि कुंदनची ज्वेलरी आणि मोकळे केस अशा तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
खास म्हणजे किमच्या ओठांच्या स्माईलने तिच्या सौंदर्यात चारचांद लावले आहेत. लिएंडर पेसदेखील ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे. त्याने व्हाईट कुर्ता पायजामा आणि डोक्यावर ऑरेंज रंगाची फेटा बांधलेला दिसतो आहे.
किमने या वेडिंग अल्बममध्ये आपलं आउटफिट फ्लॉन्ट करते सोलो फोटोजदेखील शेअर केले आहेत. लिएंडर आणि किमच्या कपल फोटोंकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. फॅन्सनेदेखील किम आणि लिएंडरच्या जोडीचे कौतुक केले आहे.
एका युजरने लिहिलंय, 'खूपचं ग्रेसफुल.' दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, 'तुम्ही दोघे शानदार दिसत आहात. तर आणखी एका युजरने किमच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. त्याने लिहिलंय-'तू आजदेखील २० वर्षांची मुलगी दिसतेस.'