पुढारी ऑनलाईन
शाहरूख खान येत्या मार्च महिन्यापासून दिग्दर्शक राजकुमार हिराणींच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहे. पंजाबमधून कॅनडात होणार्या अवैध स्थलांतरावर आधारित हा एक सोशल कॉमेडी ड्रामा असणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत तापसी पन्नू आहेच; पण आता या चित्रपटात अभिनेता विकी कौशलही असल्याचे समोर आले आहे. विकीची या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका असणार आहे.
विकी आणि राजकुमार हिराणींची एक बैठकही नुकतीच झाली आहे. हिराणींच्या 'संजू'मध्ये विकीने केलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. तेव्हापासूनच दोघांतले संबंध उत्तम आहेत.