मनोरंजन
mouni roy : मौनी-सूरज हनिमूनसाठी काश्मीरमध्ये
पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री मौनी रॉय आणि उद्योगपती सूरज नांबियार हे कपल लग्नानंतर एका आठवड्याने आता काश्मीरमध्ये हनिमूनसाठी गेले आहे. 27 जानेवारी रोजी या कपलने गोव्यात लग्न केले होते. आधी मल्याळम् आणि नंतर बंगाली प्रथेनुसार दोघांनी लग्न केले. सूरज दुबईस्थित उद्योगपती आहे. दोघेजण गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. दरम्यान, काश्मीरमध्ये मौनीने चाहत्यांसोबत काढलेले काही फोटोज् सोशल मीडियात शेअर केले आहेत. मौनी आगामी काळात अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे.

